जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पाठलाग करणं चांगलंच पडलं भारी; गेंड्याने भयंकर रागात असं काही केलं...पाहा VIDEO

पाठलाग करणं चांगलंच पडलं भारी; गेंड्याने भयंकर रागात असं काही केलं...पाहा VIDEO

पाठलाग करणं चांगलंच पडलं भारी; गेंड्याने भयंकर रागात असं काही केलं...पाहा VIDEO

कार चालक (Car) एका गेंड्याचा पाठलाग करत असतो, गेंड्याला राग येतो आणि त्यानंतर जे होतं, याचा आपण कदाचित विचारही करू शकत नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 6 मे : जंगली जनावरांना त्रास देणं, त्यांचा पाठलाग करणं हे कोणालाही त्रासदायक ठरू शकतं. त्यांचा पाठलाग केल्यास ते उलट हल्ला करू शकतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. ज्यात एका कार चालकाकडून काहीशी अशीच चूक केली जाते. कार चालक (Car) एका गेंड्याचा पाठलाग करत असतो, गेंड्याला राग येतो आणि त्यानंतर जे होतं, याचा आपण कदाचित विचारही करू शकत नाही. या व्हिडीओमध्ये एका जंगलात रस्त्यावर एक गेंडा फिरत असल्याचं दिसतंय. त्याच्या पाठी एक कारही चालते आहे. कार गेंड्यांच्या मागे-मागे त्याचा पाठलाग करते आहे. त्यामुळे गेंडा काहीसा विचलित झाल्याचं दिसतंय. गेंडा हळू-हळू चालत असताना, कारही त्याच्या मागे हळू-हळू जाते आहे. पण अचानक काही समजायच्या आत, गेंडा उलटा फिरतो आणि कारवर हल्ला करतो. कार चालकाला काही कळायच्या आतच गेंडा आपल्या डोक्याने कारला धक्का देऊ लागतो. कार चालक बचावासाठी मात्र काहीही करू शकत नाही. गेंडा कारला एकदा धक्का देवून तेवढ्यावरच थांबत नाही, तर पुढे तो धक्का देत कारला पलटी करतच राहतो.

(वाचा -  जंगलाचा राजा सिंह आणि चपळ बिबट्यामध्ये झुंज; कुणी कुणावर केली मात पाहा VIDEO )

एखाद्या फुटबॉलला धक्का मारावा इतक्या सहजपणे गेंड्या कारला एका पाठोपाठ एक धक्के देत लांबपर्यंत घेवून जातो. गेंडा कारला धक्के देताना कार अनेकदा पूर्ण पलटी होते. गेंडा हे एकदा नाही, तर अनेकदा करताना दिसतो. गेंड्याने कारवर केलेल्या हल्ल्यात कारची स्थिती इतकी खराब होते, की कारच्या छप्परासह अनेक ठिकाणी ती मोडल्याचंही व्हिडीओत दिसतंय. कारचं अगदी नुकसान झाल्यानंतर काही वेळाने गेंडा शांत झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. गेंड्याचा पाठलाग करणं त्या कार चालकाला चांगलंच भारी पडलं.

(वाचा -  VIDEO:पिल्लाला वाचवण्यासाठी सिंहाशी भिडली आई; झेब्राच्या पिल्लाच्या सुटकेचा थरार )

जाहिरात

(वाचा -  ‘वदनी कवळ घेता…‘म्हटल्याशिवाय जेवत नाही;कुत्र्यांचा VIDEO पाहून वाटेल कमाल! )

हा व्हिडीओ @almodeeer1975 नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात