नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत (Aatmanirbhar Bharat) अभियानाची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक स्थानिक कंपन्या, स्टार्टअप्सनी मेड इन इंडिया (Made in India) अॅप्स निर्मितीवर भर देण्यास सुरवात केली. ट्वीटरला (Twitter) पर्याय ठरलेलं कू (Koo) हे अॅप (App) त्यापैकीच एक आहे. अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनी या भारतीय सोशल मीडिया नेटवर्किंग अॅपचा वापर सुरू केला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील 'कू' या अॅपचा वापर सुरू केला आहे.
कू म्हणजे काय? हे अॅप ट्वीटरला पर्याय कसा ठरू शकतं? -
कू हे ट्वीटरला पर्याय ठरू शकणारं एक भारतीय अॅप आहे. मार्च 2020 मध्ये अप्रमेय राधाकृष्णा (Aprameya Radhakrishna) आणि मयांक बिदावाटका (Mayank Bidawatka) यांनी या भारतीय मायक्रो ब्लागिंग वेबसाईटची (Indian Micro Blogging Website) निर्मिती केली. अगदी ट्वीटरप्रमाणेच असलेल्या या मायक्रो ब्लागिंग प्लॅटफार्मवरुन युजर्स त्यांची विविध विषयांवरील मतं मांडू शकतात.
ऑगस्ट 2020 मध्ये या अॅपने भारत सरकारचं आत्मनिर्भर अॅप इनोव्हेशन चॅलेंज जिंकलं. हे अॅप विविध भारतीय प्रादेशिक भाषांना (Indian regional Language) सपोर्ट करतं. त्यामध्ये हिंदी, तेलुगू, कन्नड, बंगाली, तामिळ, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी, ओरिया आणि आसामी या भाषांचा समावेश आहे.
युजर्स या प्लॅटफार्मवरुन फोटो, व्हिडीओ, ऑडिओ तसंच पोस्ट शेअर करू शकतात. ट्वीटरलाप्रमाणेच कू वरुनदेखील युजर्स डीएम्सच्या (DM) माध्यमातून चॅटिंग करू शकतात. त्याचप्रमाणे या मायक्रो ब्लागिंग प्लॅटफार्मच्या माध्यमातून पोल्स देखील जाणून घेता येऊ शकतात.
कू डाऊनलोड कसं कराल?
कू हे अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) आणि अॅपल अॅप स्टोअरवर (Apple Play Store) उपलब्ध आहे. या माध्यमातून युजर्स हे अॅप त्यांच्या आयफोन आणि अँड्रॉईड फोनवर डाऊनलोड करू शकतात. या अॅपला गुगल प्ले स्टोअरवर सरासरी रेटींग 4.7 स्टार्स, तर 4.1 स्टार्स आयओएस अॅप स्टोअरवर मिळाले आहेत. अँड्रॉईडवर या अॅपला 49,400 वर रिव्ह्यू मिळाले असून लाखो युजर्सने हे अॅप डाऊनलोड करत अनेक रिव्ह्यूजही लिहिले आहेत.