जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Top 10 Apps : ‘या’ 10 अ‍ॅप्सवर लोकांनी 2021 मध्ये खर्च केले सर्वाधिक पैसे

Top 10 Apps : ‘या’ 10 अ‍ॅप्सवर लोकांनी 2021 मध्ये खर्च केले सर्वाधिक पैसे

Top 10 Apps : ‘या’ 10 अ‍ॅप्सवर लोकांनी 2021 मध्ये खर्च केले सर्वाधिक पैसे

टॉप 100 नॉन-गेम अ‍ॅप्सने सबस्क्रिप्शन मॉडेलसह 2021 मध्ये 13.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1,01,300 कोटी रुपये रेव्हेन्यू मिळवला. 2020 च्या तुलनेत यात वार्षिक 31 टक्क्यांनी वाढ झाली.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 28 फेब्रुवारी : रिसर्च फर्म सेन्सर टॉवरच्या स्टोअर इंटेलिजन्स डेटानुसार (Sensor Tower’s Store Intelligence data) 2021मध्ये मोबाईल अ‍ॅप्सवर (mobile apps) लोकांनी खूप खर्च केला असून या वर्षात या खर्चाचा उच्चांक नोंदवला गेला. डेटामधील माहितीनुसार, टॉप-100 नॉन-गेम सबस्क्रिप्शन-आधारित अ‍ॅप्सचा जगभरातील महसूल 13 अब्ज डॉलर्सवरून (अंदाजे 97,572 कोटी रुपये) 18.3 अब्ज डॉलर्स (अंदाजे 1,37,300 कोटी रुपयांवर) पोहोचला आहे. यामध्ये वार्षिक 41 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नॉन-गेम अ‍ॅप्सवर (non-game apps) आणि मोबाईल गेम (mobile games) दोन्ही प्रकारांमध्ये अ‍ॅप-मधील खरेदीवर खर्च केलेल्या 131.6 अब्ज डॉलर्सपैकी सुमारे 14 टक्के उत्पन्न हे केवळ सर्वाधिक कमाई करणार्‍या 100 अ‍ॅप्सनी मिळवलं आहे. हे 2020 मध्ये सुमारे 11.7 टक्क्यांनी वाढलं होतं, असं सेन्सर टॉवर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. Q4 2021 मध्ये, जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 100 अ‍ॅप्सपैकी 86 ने सबस्क्रिप्शन ऑफर केलं, असं रिसर्च फर्मने म्हटलं आहे. महसूलाचं प्रमाण Q4 2020 मध्ये 87 टक्क्यांवर खाली आलं. कारण Q4 2019 मध्ये हे प्रमाण 89 टक्के होतं. रिपोर्टनुसार, या टॉप सबस्क्रिप्शन अ‍ॅप्सने अॅप स्टोअर (App Store) आणि गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) दुप्पट खर्च केला आहे. टॉप 100 नॉन-गेम अ‍ॅप्सने सबस्क्रिप्शन मॉडेलसह 2021 मध्ये 13.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1,01,300 कोटी रुपये रेव्हेन्यू मिळवला. 2020 च्या तुलनेत यात वार्षिक 31 टक्क्यांनी वाढ झाली. गुगल प्ले स्टोअरवरील टॉप सबस्क्रिप्शन अ‍ॅप्समध्ये अधिक वाढ झाली आहे, तर अॅप स्टोअरवरील टॉप अ‍ॅप्सने गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास तिप्पट खर्च केला आहे. त्यांच्या सबस्क्रिप्शन मॉडेल्सद्वारे सर्वाधिक पैसे कमवणाऱ्या टॉप अ‍ॅप्सपैकी, Apple च्या अ‍ॅप स्टोअरवर आणि एकंदरीत इतर ठिकाणी YouTube पहिल्या क्रमांकावर आले. Google One हे Google Play Store वरील टॉप अ‍ॅप होते. एकूण कमाई, Apple अ‍ॅप स्टोअर रेव्हेन्यू आणि Google Play Store च्या कमाईनुसार काही Overall टॉप अ‍ॅप्सची लिस्ट खालीलप्रमाणे आहे. 1. YouTube, 2. Tinder, 3. Piccoma, 4. Google One, 5. Disney+, 6. Tencent Video, 7. iQIYI, 8. HBO Max, 9. Twitch, 10. LINE Apple App Store वरील टॉप 10 अ‍ॅप्स 1. YouTube 2. Tinder 3. Tencent Video 4. iQIYI 5. Disney+, 6. Piccoma, 7. QQ Music, 8.Youku, 9. HBO Max, 10. Hulu Google Play Store वरील टॉप 10 अ‍ॅप्स 1. Google One, 2. Piccoma, 3. Disney+, 4. HBO Max, 5. Twitch, 6. Tinder, 7. Pandora, 8. LINE, 9. ESPN, 10. Facebook ही आहेत गुगल प्ले स्टोर आणि Apple App Store वरील काही टॉप अ‍ॅप्सची यादी.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात