• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • तीन दिवसांनंतर SMS सर्विस बंद होऊन कोणताही OTP येणार नाही? TRAI ने दिली माहिती

तीन दिवसांनंतर SMS सर्विस बंद होऊन कोणताही OTP येणार नाही? TRAI ने दिली माहिती

ग्राहकांना मोठ्या प्रमाणात कमर्शियल SMS पाठवण्यासाठी टेलिमार्केटिंग नियमांचं पालन करण्यासाठी तीन दिवसांच्या आत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. असं न केल्यास कंपन्यावर त्यांच्या ग्राहकांना कमर्शियल SMS पाठवण्यावर बंदी घातली जाईल.

  • Share this:
    नवी दिल्ली, 14 मार्च : टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने (TRAI) दिलेल्या माहितीनुसार, बँक, लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स बिजनेस युनिट्सना आपल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात कमर्शियल SMS पाठवण्यासाठी टेलिमार्केटिंग नियमांचं पालन करण्यासाठी तीन दिवसांच्या आत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. असं न केल्यास कंपन्यावर त्यांच्या ग्राहकांना कमर्शियल SMS पाठवण्यावर बंदी घातली जाईल. या कंपन्यांनी ट्रायचे नियम न पाळल्यास, तीन दिवसांनंतर बँक, लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स कंपन्यांकडून येणारे कमर्शियल SMS बंद होतील. त्यामुळे ग्राहकांना बँक, शॉपिंग आणि इतर कामात समस्या येऊ शकतात. स्पॅम मेसेज आणि ऑनलाईन फ्रॉडवर लगाम घालण्यासाठी नवीन SMS रेग्लुलेशन करण्यात आल्याचं TRAI ने सांगितलं. तसंच ज्या कंपन्यांनी या रेग्लुलेशनला अद्याप फॉलो केलं नाही त्यांना तीन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे, जेणेकरुन ते नव्या नियमांनुसार रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकतील. ज्या कंपन्या तीन दिवसांनंतरही हे नियम फॉलो करणार नाही, त्या कंपन्यांचं नाव डिफॉल्टर कंपनी म्हणून कंपनीच्या वेबसाईटवर पोस्ट केलं जाईल. 8 मार्चपासून OTP येणं बंद झालं - SMS सर्विसमध्ये व्यत्यय आल्याने बँका, ई-कॉमर्स आणि इतर कंपन्याना SMS येण्यास अतिशय वेळ लागत होता. ही समस्या एखाद्या नेटवर्क किंवा App ची नव्हती तर अनेक ठिकाणी होती. CoWIN रजिस्ट्रेशन OTP, डेबिट कार्ड ट्रान्झेक्शनसाठी बँक OTP तसंच सिस्टम बेस्ड टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन OTP येण्यासही वेळ लागत होता. SMS संबंधी नवे रेग्लुलेशन यासाठी लागू करण्यात आले आहेत, जेणेकरुन SMS द्वारे होणाऱ्या फ्रॉडवर लगाम लावला जाईल. परंतु नवीन SMS रेग्लुलेशन लागू करण्यासह अनेक समस्या येऊ लागल्या. त्यामुळे TRAI ने 7 दिवसांसाठी नवे नियम सस्पेंड केले. ट्रायने हा निर्णय नव्या नियमांमुळे OTP आणि SMS संबंधी समस्या येण्याची तक्रार मिळाल्यानंतर केला होता. आणि कंपन्यांना नवीन फ्रेमवर्कचा अवलंब करण्यासाठी आणखी 7 दिवसांचा वेळ दिला होता. काय आहे संपूर्ण प्रकरण - दिल्ली हायकोर्टने टेलिकॉम रेग्युलेटर TRAI ला आदेश दिले होते की, अशा फ्रॉड, खोट्या SMS वर त्वरित रोख लावावी, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांची यात फसवणूक होऊ नये. कोर्टाचा हा आदेश पूर्ण करण्यासाठी TRAI ने नवी DLT सिस्टम सुरू केली. नव्या DLT सिस्टममध्ये रजिस्टर्ड टेम्पलेटवाल्या प्रत्येक SMS च्या कॉन्टेंटला वेरिफाय केल्यानंतरच डिलिवर केलं जाईल. या संपूर्ण प्रक्रियेला स्क्रबिंग म्हणतात. ही प्रक्रिया यापूर्वीही अनेकदा लागू करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु अखेर सोमवारी 8 मार्च रोजी याला लागू करण्यात आलं. 8 मार्चला नेमकं काय झालं - दरम्यान, देशभरात सोमवारी लाखो नागरिकांनी एसएमएस (SMS) आणि ओटीपी (OTP) मिळण्यास उशीर होत असल्याचा किंवा एसएमएस येतच नसल्याचा अनुभव आला. त्यामुळे सगळीकडे अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला होता. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड पेमेंट्स, ई-कॉमर्स सर्व्हिसेससह कोविड लसीसाठी आवश्यक असणाऱ्या को-विन अ‍ॅपवरील (Co-Win App) नोंदणी सेवादेखील यामुळे ठप्प झाली होती. त्यामुळे लाखो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. सोमवारी सकाळपर्यंत 40 टक्के एसएमएस आणि ओटीपी सेवा विस्कळीत झाली होती. यामागे कोणताही घातपात किंवा अपघात नव्हता, तर टेलिकॉम कंपन्यांनी व्यावसायिक जाहिरातींच्या एसएमएसबाबतच्या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू केली असल्यानं, त्याचा परिणाम एसएमएस सेवेवर झाला होता. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायनं (TRAI-Telecom Regulatory Authority of India) दूरसंचार ऑपरेटर्सना (Telecom Operators) ग्राहकांना पाठवण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या बल्क एसएमएसबाबत लागू करण्यात आलेल्या निकषांची अंमलबजावणी करण्यास सांगितलं असल्यानं त्याचा फटका ओटीपी पाठवण्यासाठी आवश्यक असलेल्या एसएमएस सेवेलाही बसला. लाखो ग्राहकांना बँकेचे व्यवहार करताना ओटीपी मिळू शकले नाहीत, त्यामुळं बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाले. टेलिफोन ऑपरेटर्सनी नवीन डीएलटी प्रक्रिया लागू केल्यानं त्याचा परिणाम नोटिफिकेशन्स पाठवण्यावर झाला आहे. डीस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी (DLT) ही ब्लॉकचेन आधारित नोंदणी प्रणाली आहे. TRAI च्या म्हणण्यानुसार, टेलिमार्केटर्सना डीएलटी (DLT) प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणं अनिवार्य आहे. तर व्यावसायिक जाहिरातींचे संदेश पाठवणाऱ्या सर्व कंपन्यांना 7 मार्चपूर्वी नोंदणी करण्यासाठी सांगण्यात आले होते, असं स्पष्टीकरण टेलीकॉम ऑपरेटर्सनी दिलं आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published: