मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

TikTokने Facebookला मागे टाकलं, एका महिन्यात केलेली कमाई वाचून थक्क व्हाल

TikTokने Facebookला मागे टाकलं, एका महिन्यात केलेली कमाई वाचून थक्क व्हाल

2019 मध्ये जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या अॅपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे अॅप ठरले असून याबाबतीत फेसबुकला मागे टाकलं आहे.

  • Published by:  Suraj Yadav

नवी दिल्ली, 15 जानेवारी :  सध्या सोशल मीडियावर TikTok व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. कमी वेळेचे हे व्हिडिओ तितक्याच कमी वेळात व्हायरल होतात आणि प्रसिद्धीही मिळवून देतात. टिकटॉकची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर जगभरात वाढली आहे. 2019 मध्ये जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या अॅपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे अॅप आहे. व्हॉटस्अॅप यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. याबाबतीत टिकटॉकने फेसबुकला मागे टाकलं आहे.

अहवालानुसार, 2019 च्या चौथ्या तिमाहीमध्ये टिकटॉक हे अॅप 220 मिलियनवेळा डाउनलोड करण्यात आल्या आहेत. हे प्रमाण गेल्या तिमाहीच्या तुलनेत 24 टक्के वाढ झाली आहे. रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, टिकटॉकच्या कमाईत तब्बल 540 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सेन्सर टॉवरने दावा केला आहे की, फक्त डिसेंबर महिन्यात टिकटॉकने 40 मिलियन डॉलर म्हणजेच 283 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत टिकटॉक गेल्या महिन्यात 7 व्या क्रमांकावर राहिले होते. टिक-टॉकची सर्वाधिक कमाई चीनमध्ये होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे.

शुभेच्छा देणाऱ्या मेसेजमधून आलाय VIRUS, तुमचाही मोबाईल होऊ शकतो हॅक

2019 मध्ये टिकटॉक अॅप 700 मिलियनवेळा डाऊनलोड करण्यात आले. यामध्ये आयफोन, आयपॅड आणि गुगल प्ले स्टोअरचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 45 टक्के अॅप भारतातच डाऊनलोड करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अॅप स्टोअरवर टिकटॉक डाऊनलोडमध्ये 83 टक्के वाढ झाली होती.

मोबाइल गरम होत असेल तर काळजी घ्या, होऊ शकतो स्फोट

First published:

Tags: Facebook, Tiktok viral video