मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नववर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या मेसेजमधून आलाय VIRUS, तुमचाही मोबाईल होऊ शकतो हॅक

नववर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या मेसेजमधून आलाय VIRUS, तुमचाही मोबाईल होऊ शकतो हॅक

स्टेप 1- सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये WhatsApp ओपन करा आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणारा नंबर सर्च करा.

स्टेप 1- सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये WhatsApp ओपन करा आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणारा नंबर सर्च करा.

नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणाऱा असा मेसेज तुम्हालाही आला असेल तर तो डिलिट करा. त्यातून व्हायरस स्मार्टफोनमध्ये शिरत आहे.

  • Published by:  Suraj Yadav

सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप WhatsApp सातत्याने नवनवे अपडेट देत असते. फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉटसअॅपने फॉरवर्ड मेसेज असेल तर तसं नोटिफिकेशन मेसेजवर दिसतं. व्हॉटसअॅपच्या माध्यमातूनही आता सायबर हल्ला केला जात आहे. नव्या वर्षात हॅकर्सनी नवी ट्रिक वापरली आहे. नव्या वर्षानिमित्त सर्वचजण एकमेकांना शुभेच्छा देतात. याचाच फायदा घेत New Year Virus हॅकर्सनी अॅक्टिव्ह केला आहे. यातून स्मार्टफोनला टार्गेट केलं जात आहे.

युजर्सना एक मेसेज व्हॉटसअॅपवर पाठवला जातो. यामध्ये एक वेबलिंक असते. यामध्ये तुम्हाला काही ऑफर दिल्या जातात. या आकर्षक ऑफरवर युजर क्लिक करताच एक वेबपेज ओपन होतं. त्याच्या माध्यमातून तुमच्या स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरमधील डेटा हॅक केला जाऊ शकतो. अशा खोट्या लिंक तुम्हाला नव्या वर्षाच्या हटके शुभेच्छा देण्याचा बहाण्याने पाठवल्या जात आहेत. तसेच काही अॅप्स डाऊनलोड करण्यासाठीच्या लिंकही फ़ॉरवर्ड केल्या जात आहेत.

वाचा : Android फोन्समध्ये Apple सारखी सुविधा; या कंपन्यांचे नवे फीचर

व्हॉटसअॅपवर येणाऱ्या अशा लिंक क्लिक करू नका. काही दिवसांपूर्वी एसबीआयच्या क्रेडिट कार्डची लिंक व्हायरल होत होती. यामुळे खात्यातून रक्कम हॅकर्स काढून घेत होते. काही अॅप्समधून तुमची बँक खात्यांची माहिती, क्रेडिट-डेबिट कार्डच्या डिटेल्स घेतल्या जातात. त्यामुळं तुम्ही असे मेसेज आले असतील तर ते क्लिक न करता डिलिट करा.

वाचा : मोबाईल चोरी झाला असेल तर 'इथं' शोधा, सरकारनेच उचललं पाऊल

फक्त व्हॉटसअॅपच नाही तर इतर अॅपवर जाहिरातीच्या माध्यमातून काही लिंक्स येतात. त्याशिवाय टेक्स्ट मेसेजही पाठवले जातात. त्यामुळे अशा प्रकराच्या मेसेजवर क्लिक करू नका आणि त्या डिलिट करा.

वाचा : 'या' मोबाईलमध्ये चालणार नाही Whatsapp, कंपनीने घेतला मोठा निर्णय

First published:

Tags: Whatsapp