नवी दिल्ली, 9 मे : आपलं आरोग्य फिट ठेवण्यासाठी सध्या अनेक लोक सतर्क असल्याचं दिसतं. टेक्नोलॉजीमुळे तर हे काम अधिक सोपं, फास्ट झालं आहे. अनेक जण यासाठी Fitbit चा वापर करतात. हे स्मार्टवॉच हेल्थ आणि इतर फिजिकल अॅक्टिव्हिटी ट्रॅक करत असल्याने आपल्या हेल्थबाबतची माहिती अगदी सहज मिळवता येते. पण एका महिलेला याच Fitbit च्या मदतीने पार्टनर धोका देत असल्याची माहिती मिळाली. Fitbit हे एक स्मार्टवॉच आहे, ज्याचा मदतीने लोक आपल्या फिटनेसकडे लक्ष देतात. परंतु हेच स्मार्टवॉच एका कपलच्या ब्रेकअपचं कारण ठरलं आहे. नाडिया नावाच्या महिलेला फिटनेस ट्रॅकरच्या नोटिफिकेशनद्वारे, तिची फसवणूक करणाऱ्या पार्टनरविषयी माहिती मिळाली. महिलेने स्वत: एका व्हिडीओद्वारे याबाबतचा खुलासा केला आहे. एका रात्री तिचा बॉयफ्रेंड अतिशय उशीरा घरी आला. सकाळी उठल्यानंतर तिने आपल्या बॉयफ्रेंडसाठी ब्रेकफास्ट बनवण्याचं ठरवलं. त्याचवेळी तिच्याकडे एक नोटिफिकेशन आलं.
(वाचा - कारमधून कचरा नदीत फेकणं पडलं भारी; VIDEO व्हायरल झाल्यानंतर महिलांवर कठोर कारवाई )
त्या रात्री बॉयफ्रेंड उशीरा घरी आल्याने, तो ऑफिसमध्ये रात्री उशीरापर्यंत काम असेल असं तिला वाटलं होतं. म्हणूनच ती सकाळी उठून त्याच्यासाठी नाश्ता बनवण्यासाठी गेली. त्याचवेळी आलेल्या नोटिफिकेशनने मात्र ती पुरती हादरली.
(वाचा - तलावात पाणी पिण्यासाठी आलेल्या म्हशीवर मगरीचा हल्ला; पुढे जे झालं….पाहा VIDEO )
तिच्या बॉयफ्रेंडने रात्री दोन ते तीनदरम्यान 500 कॅलरीज बर्न केल्याचं त्या नोटिफिकेशनमध्ये आलं होतं. हे नोटिफिकेशन पाहून तिला मोठा धक्काच बसला. त्यानंतर मात्र बॉयफ्रेंडशी ब्रेकअप केल्याचं तिने सांगितलं.