नवी दिल्ली, 25 एप्रिल : सिंहाला जसं जंगलाचा राजा मानलं जातं. तसंच पाण्यात राहणारी ताकदवान मगरही (Crocodile) एखाद्या राजापेक्षा कमी नाही. कोणत्याही प्राण्यावर मगर हल्ला करुन त्याला फस्त करू शकते. मगरीची एखादीच शिकारी चुकू शकते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये मगर एका म्हशीची शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. हा व्हिडीओ बीबीसी अर्थने आपल्या यूट्यूब चॅनलवरुन शेअर केला आहे.
मैदानात असलेल्या एका तलावावर म्हशींची एक मोठी झुंड पाणी पिण्यासाठी येते. या तलावात एक मगरही आहे. म्हैस पाणी पिण्यास सुरुवात करतात, तसं मगर त्या म्हशींच्या झुंडीवर हल्ला करते. याचवेळी मगर एका म्हशीला पकडते आणि तिला तलावात खेचण्याचा प्रयत्न करते.
मगर म्हशीला पाण्यात ओढण्यासाठी संपूर्ण ताकद लावते. परंतु म्हैसदेखील हिंमत न हारता पूर्ण ताकदीनिशी मगरीच्या जबड्यातून सुटण्याचा प्रयत्न करते. मगर म्हशीचं तोंड आपल्या जबड्यात पकडून खेचण्याचा प्रयत्न करते, तर दुसरीकडे म्हैसही ताकद लावून तलावापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते. या संपूर्ण झटापटीत म्हैस मगरीला पाण्यातून संपूर्ण बाहेर काढते.
याचदरम्यान बाहेर असलेल्या म्हशी मगरीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मगरीला म्हशीने तलावातून खेचून बाहेर काढल्यानंतर, मगर घाबरुन पुन्हा आत तलावात जाते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांच्या यावर प्रतिक्रियाही येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.