• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Smartphone च्या या App ने घटवलं Heart Attack चं प्रमाण, वाचा काय आहे हे अ‍ॅप्लिकेशन

Smartphone च्या या App ने घटवलं Heart Attack चं प्रमाण, वाचा काय आहे हे अ‍ॅप्लिकेशन

रिसर्चर्सने Mobile App द्वारे Hello Heart ची माहिती दिली आहे. ब्लड प्रेशर कंट्रोल करणं आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी या App ने लोकांची मदत केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : आपल्या बदलत्या लाइफस्टाइलसह आपल्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. सध्याच्या काळात कमी वयोगटातील लोकांनाही हार्ट अटॅक येण्याच्या समस्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. हार्ट अटॅक अतिशय सर्वसामान्य गोष्ट असून ती घातकही ठरू शकते. हेच पाहता रिसर्चर्सने Mobile App द्वारे Hello Heart ची माहिती दिली आहे. ब्लड प्रेशर कंट्रोल करणं आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी या App ने लोकांची मदत केली आहे. Hello Heart Program - Hello Heart प्रोग्राम तीन वर्षांचा एक अभ्यास आहे, ज्यात 28 हजार अडल्ट सामिल झाले होते. या अभ्यासात एक स्मार्टफोन App आणि त्यासंबंधी एका मॉनिटरच्या मदतीने या लोकांचं ब्लड प्रेशर कंट्रोल केलं गेलं. ब्लड प्रेशर मॉनिटर App ला आपोआप तुमचं रीडिंग्स पाठवतो. हे App ब्लड प्रेशर, वजन आणि फिजिकल अॅक्टिव्हिटी ट्रॅक करण्याची सुविधा देतं. तसंच हे App योग्य डाएट आणि व्यायाम यासारख्या गोष्टीही सांगतं,ज्यामुळे व्यक्ती आपल्या ब्लड प्रेशरची योग्य काळजी घेऊ शकतील. JAMA Network Open जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, तीन वर्ष हॅलो हार्ट प्रोग्रामचा भाग असलेल्या लोकांपैकी स्टेज टूच्या हायपरटेंशनची समस्या असलेल्या 85 टक्के लोकांनीा पहिल्या वर्षातच सिस्टोलिक प्रेशरमध्ये कमी आढळली. त्यांचं ब्लड प्रेशर इतर दोन वर्षांतही कमी झालेलं आढळलं.

  मृत्यूनंतर कोण हँडल करेल तुमचं Google Account? वाचा या डेटाचं नेमकं काय होतं

  यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन फ्रांसिस्कोतील प्रोफेसर आणि हृदयरोग डॉक्टर अलेक्सिस बीटी यांनी सांगितलं, की हा अभ्यास पहिलाच असा अभ्यास आहे, ज्याने Hello Heart Program सारख्या ब्लड प्रेशर मॅनेजमेंटसाठी बनवण्यात आलेल्या डिजीटल हेल्थ अॅप्लिकेशन प्रोग्रामचं लाँग टर्म असेस्मेंट केलं. हा प्रोग्राम 1 जानेवारी, 2015 आणि 1 जुलै, 2021 दरम्यान आयोजित करण्यात आला होता, ज्यांना बीपी आणि हायपरटेंशनची समस्या आहे. तुम्हीही ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी अशा अनेक Apps चा वापर करू शकता, ज्यामुळे तुमची मदत होऊ शकते.
  Published by:Karishma
  First published: