नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपचा वापर (Whatsapp ) सातत्यानं देशात वाढत आहे. त्यात आता युजर्ससाठी वेगवेगळे फीचर्सही देण्यात येत आहे. त्यामुळं युजर्सला Whatsapp वापरणं आणखी सोपं होत आहे. परंतु अनेकदा युजर्सला व्हॉट्सअॅपवर नाराज झालेल्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून (how to unblock someone on whatsapp) ब्लॉक करण्यात येतं. त्यावेळी चॅटिंग करता येत नाही. त्यामुळं आता अकाउंट ब्लॉक केल्यानंतरही युजर्सला मेसेज पाठवता येणार आहे. त्यासाठी कोणत्या ट्रिक्स आहेत हे जाणून घेऊयात.
व्हॉट्सअॅपवर एकदा ब्लॉक केल्यानंतर मेसेज करता येत नाही असं अनेकांना वाटतं. परंतु असं नाही. त्यासाठी युजर्सला दुसऱ्या एका (how to recover report and block chat in whatsapp on android) मित्राच्या व्हॉट्सअॅप अकाउंटवरून एक ग्रुप तयार करावा लागेल. त्यात ज्यानं ब्लॉक केलेलं आहे त्या युजरला Add करावं लागेल. त्यानंतर त्या ग्रुपवर मेसेज केल्यानंतर त्या युजर्सला मेसेज दिसेल. त्यामुळं त्या ठिकाणी चॅटिंगही केली जाऊ शकते.
Whatsapp वर 'Last Seen' बद्दल नवीन अपडेट; अनेकांचं टेन्शन कमी होणार
स्वत:ला कसं कराल अन-ब्लॉक?
दुसऱ्या युजर्सने ब्लॉक केल्यानंतर त्यासाठी सर्वात आधी WhatsApp ला रि इन्स्टॉल करायला हवं. त्यानंतर ज्यानं तुम्हाला ब्लॉक केलेलं आहे. त्या व्यक्तीला मेसेज करून कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. कारण त्यावेळी WhatsApp अकाउंट Unblock झालेलं असतं.
Apple कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने iPhone चं पितळ पाडलं उघडं; सिक्रेट्स आले समोर
ही आहे प्रोसेस...
सर्वात आधी WhatsApp ओपन करा. त्यानंतर Setting आणि त्यानंतर Account या ऑप्शनवर क्लिक करा. यावेळी तुम्हाला Delete My Account चा पर्याय तुम्हाला दिसेल त्याला प्रेस करा. त्यानंतर तुम्हाला Delete History आणि लेफ्ट ग्रुप्सचा ऑप्शन मिळेल. त्यानंतर कंट्री सेलेक्टशनचा पर्याय तुम्हाला स्क्रिनवर दिसेल. त्यानंतर मोबाईल नंबर एन्टर करा. अशा प्रकारे तुमचं WhatsApp अकाउंट डिलीट होईल.
बटाटा विक्रेत्याची कमाल! VIP मोबाईल नंबरसाठी मोजले इतके लाख; 3 iPhone एवढी किंमत
त्यानंतर Google Play Store वरून नवीन व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करा. त्यात मोबाईल नंबर टाकून चालू केल्यानंतर त्यात कॉन्टॅक्ट लिस्ट जोडली जाईल. त्यानंतर ज्या युजर्सने तुम्हाला ब्लॉक केलं आहे त्या युजर्सशी रिकनेक्ट होता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.