Home /News /technology /

सावधान! स्मार्टफोनमधील या 11 Apps मुळे तुमचं कुटुंब येऊ शकतं धोक्यात; साडेआठ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केली आहेत डाउनलोड

सावधान! स्मार्टफोनमधील या 11 Apps मुळे तुमचं कुटुंब येऊ शकतं धोक्यात; साडेआठ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केली आहेत डाउनलोड

सावधान! स्मार्टफोनमधील ही 11 अ‍ॅप तुमची हेरगिरी करत नाहीत ना? 8 कोटींपेक्षा जास्त लोकांनी केली आहेत डाउनलोड

सावधान! स्मार्टफोनमधील ही 11 अ‍ॅप तुमची हेरगिरी करत नाहीत ना? 8 कोटींपेक्षा जास्त लोकांनी केली आहेत डाउनलोड

Android Alert! सायबर न्यूजकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही टॉप अँड्रॉइड अ‍ॅप्स युजर्सची आणि त्याच्या कुटुंबातील लहान मुलं तसेच सदस्यांची माहिती हॅकर्स किंवा सायबर गुन्हेगारांना देऊ शकतात. साडेआठ कोटींमध्ये तुम्ही तर नाही ना?

    मुंबई, 5 जुलै: स्मार्टफोन ही आता काळाची गरज झाली आहे. स्मार्टफोनमुळं आपलं जगणं सुसह्य झालं आहे. स्मार्टफोनच्या मदतीने आपण अनेक गोष्टी घरबसल्या करू शकतो, परंतु स्मार्टफोनचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटेसुद्धा आहेत. अँड्रॉइड फोनवर हॅकिंग आणि डेटा लीकच्या (Hacking and Data leak) बातम्या रोज येत असतात आणि आता यूजर्ससाठी आणखी एक अलर्ट समोर आला आहे. वास्तविक काही सर्वात लोकप्रिय ट्रॅकिंग अ‍ॅप्स (Hacking Apps) आढळून आली आहेत, जी वापरकर्त्याची हेरगिरी करू शकतात. हे असे अ‍ॅप्स आहेत, जे लहान मुलं आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वापरली जातात. सायबर न्यूजकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही टॉप अँड्रॉइड अ‍ॅप्स (Dangerous Android Apps) वापरकर्त्यांची आणि त्याच्या कुटुंबातील मुलांची तसेच सदस्यांची माहिती ट्रॅक करून ती हॅकर्स किंवा सायबर गुन्हेगारांना पुरवू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, ही अँड्रॉइड अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवर 850 लक्ष किंवा साडेआठ कोटी वेळा डाउनलोड केली गेली आहेत. या अ‍ॅप्समध्ये सिक्योर सॉकेट लेयर (SSL) सर्टिफिकेश योग्यरित्या लागू करण्यात आलेलं नाही. त्यामुळे ते मॅन-इन-द-मिडल (MITM) हल्ल्यांपासून वाचण्यासाठी असुरक्षित आहेत,  असा दावा केला गेला आहे. चला जाणून घेऊया अशी कोणती अ‍ॅप आहेत, जी तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकतात. ​1. FamiSafe: Parental Control app: या अ‍ॅपमध्ये दोन संशयास्पद मॅलिशियस लिंक्स आढळल्या आहेत. याला मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर 100 पैकी 30 गुण मिळाले आहेत. 2. ​Phone Tracker by Number : या अ‍ॅपमध्ये एक संशयास्पद लिंक आढळली आहे. या अ‍ॅपला मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर 100 पैकी फक्त 23 गुण मिळाले आहेत. हेही वाचा: चाणक्य नीती : कामात यश मिळवण्यासाठी एका ठराविक संख्येनुसारच करावीत ही 5 कामं 3. FamiSafe: Parental Control app: हे अ‍ॅपसुद्धा तुमच्या कुटुंबासाठी घातक ठरू शकते. या अ‍ॅपमध्ये एक असुरक्षित लिंक सापडली आहे. या अ‍ॅपला मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर 100 पैकी 23 गुण मिळाले आहेत. 4. ​​My Family locator GPS अ‍ॅपमध्येही एक धोकादायक लिंक आढळली आहे. या अॅपला मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर 100 पैकी 41 गुण मिळाले आहेत. 5. trackerFind my kids, location tracker:  या अ‍ॅपमध्ये एक संशयास्पद लिंक आढळली आहे. या अ‍ॅपला मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर 100 पैकी 36 गुण मिळाले आहेत. 6. Pingo by Findmykids: मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर अ‍ॅपला 100 पैकी 53 गुण मिळाले आहेत. 7. Family GPS tracker KidsControl: मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर अ‍ॅपला 100 पैकी 47 गुण मिळाले आहेत. हेही वाचा: सावधान! WhatsApp वापरताना कधीही करू नका या चुका, नाहीतर जावं लागेल तुरुंगात 8. ​MMGuardian Parent app: मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर अ‍ॅपला 100 पैकी 43 गुण मिळाले आहेत. 9. ​Family Locator – GPS Tracker and Find your phone app: मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर अ‍ॅपला 100 पैकी 43 गुण मिळाले आहेत. 10. ​Find my phone. Family GPS Locator by Familo: मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर अ‍ॅपला 100 पैकी 45 गुण मिळाले आहेत. 11. ​MMGuardian app for Child Phone:  मोबाईल सिक्युरिटी फ्रेमवर्क (MobSF) वर अ‍ॅपला 100 पैकी 44 गुण मिळाले आहेत.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Android, Apps, Smartphones, Spyware

    पुढील बातम्या