Home /News /technology /

सावधान! WhatsApp वापरताना कधीही करू नका या चुका, नाहीतर जावं लागेल तुरुंगात

सावधान! WhatsApp वापरताना कधीही करू नका या चुका, नाहीतर जावं लागेल तुरुंगात

WhatsApp हेही एक अतिशय लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. मात्र, युजर्स WhatsApp च्या पॉलिसीकडे (Policies for WhatsApp Users) लक्ष देत नाहीत

नवी दिल्ली 02 जुलै : इंटरनेटचं (Internet) जग खूप मोठं आहे, त्यामुळे तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही ती लगेच सर्च करून मिळवू शकता. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातली माहिती मिळवता येते. इंटरनेटमुळे आपल्याला लोकांशी संपर्कात राहता येतं. इंटरनेटच्या मदतीने क्षणार्धात आपले मेसेज देश-परदेशात पोहोचतात. जगात अनेक मेसेंजिंग अ‍ॅप आहेत, ज्या माध्यमातून आपण दूर राहणारे नातेवाईक आणि मित्रांच्या संपर्कात राहू शकतो. WhatsApp हेही एक अतिशय लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. मात्र, युजर्स WhatsApp च्या पॉलिसीकडे (Policies for WhatsApp Users) लक्ष देत नाहीत. त्यामुळे काही चूक झाली तर युजरवर तुरुंगात जाण्याची वेळही येऊ शकते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या पॉलिसीचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातल्या त्यात तुम्ही कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन असाल तर तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर तुम्हाला तुमच्या ग्रुप मेंबर्सच्या पोस्टकडे लक्ष देणं गरजेचं आहे. Block झालेलं WhatsApp Account पुन्हा सुरु करता येणार, महत्त्वाची माहिती समोर हिंसा पसरवणाऱ्या मेसेजपासून दूर राहा जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) हिंसा पसरवणारे, समाजात द्वेष पसरवणारे मेसेज येत असतील, तर ते मेसेज शेअर करणं टाळा. कारण तुमच्याकडून अशी पोस्ट शेअर झाली असेल आणि कुणी त्या पोस्टबद्दल अक्षेपार्ह म्हणत रिपोर्ट केलं तर WhatsApp तुमचं अकाउंट ब्लॉक करतं. कंपनीच्या पॉलिसीचं पालन न करणाऱ्या लाखो अकाउंट्सवर कंपनी बंदी घालते. ते अकाउंट रिकव्हर करण्यासाठी युजर्सना स्पष्टीकरण द्यावं लागतं. त्यामुळे युजर्सनी अशा द्वेष आणि हिंसा पसरवणाऱ्या पोस्ट शेअर करणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. एवढंच नाही तर लोकांच्या धार्मिक भावना दुखवणाऱ्या पोस्ट WhatsApp वर कधीही शेअर करू नयेत. यामुळेही तुमचं अकाउंट ब्लॉक होऊ शकतं. Stand For Safety : इंटरनेटच्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी बंबलची 'स्टँँड फॉर सेफ्टी' मोहीम दंगे पसरवणाऱ्या ग्रुप्सपासून रहा दूर हल्ली व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सचा वापर दंगली पसरवण्यासाठी केला जातो. त्यामुळे तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये सामील झालात आणि त्यात आक्षेपार्ह मजकूर आला असेल तर तो ग्रुप सोडा आणि त्याबाबत पोलिसांना कळवा. पोलीस अशा ग्रुप्सवर कायदेशीर कारवाई करतात. याशिवाय चाइल्ड पॉर्न शेअर करणाऱ्यांवरही कारवाई केली जाते. याबाबत देशात कडक कायदे करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये असाल आणि त्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह माहिती किंवा व्हिडिओ येत असतील, तर त्याबद्दल पोलिसांना कळवा. आपण लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो, पण बऱ्याचदा व्हॉट्सअ‍ॅपवरून अनेक चुकीची कामेही केली जातात. त्यामुळे अशा बाबी तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही जबाबदार नागरिक म्हणून पोलिसांना त्याबद्दल माहिती द्यायला हवी.
First published:

Tags: Whatsapp alert, Whatsapp chat

पुढील बातम्या