नवी दिल्ली, 25 मार्च : ग्राहकांना आता इंधन मिळण्याची सुविधा डोर-टू-डोर मिळणार आहे. अॅप आधारित डोर-टू-डोर फ्यूल डिलिव्हरी सर्विस देण्यासाठी 'द फ्यूल डिलिव्हरी' (The Fuel Delivery) भारतात दिल्ली-एनसीआर आणि देशातील आर्थिक राजधानी मुंबईतून सुरुवात करण्यासाठी तयार आहे. मुंबई आरएसटी फ्यूल डिलिव्हरी प्रायव्हेट लिमिटेडचा उद्देश देशात फ्यूल डिलिव्हरी आणि वापराच्या मागणीत बदल घडवून आणणं आणि ग्राहकांना तसंच उत्पादन आणि लॉजिस्टिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात सक्षम बनवणं हा आहे.
द फ्यूल डिलिव्हरीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रक्षित माथुर यांनी सांगितलं की, प्रमुखत: रियल इस्टेट, रुग्णालयं, कॉर्पोरेट कार्यालय, शाळा आणि संस्था, बँका, शॉपिंग मॉल, गोदामं, ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिक तसंच कृषीसारख्या क्षेत्रात फ्यूलच्या होम डिलिव्हरीसाठी एक मोठी क्षमता आहे. तेल मार्केटिंग कंपन्यांना अंदाज आहे की, येणाऱ्या काळात 12 ते 18 महिन्यांत बाजार भाव 2000 कोटी रुपयांपर्यंत होऊ शकतो.
अॅपद्वारे ऑर्डर आणि पेमेंट सुविधा -
या सिस्टमद्वारे इंधनाची होम डिलिव्हरी मिळणार आहे. ग्राहक आपल्या स्मार्टफोनमध्ये कंपनीचं मोबाईल अॅप डाउनलोड करुन फ्यूल ऑर्डर करू शकतात. अॅपच्या माध्यमातून पेमेंट करू शकतात आणि अॅपद्वारे डिलिव्हरीचं मॉनिटरिंगही केलं जाऊ शकतं.
रक्षित माथुर यांनी सांगितंल की, आम्ही मोबाईल अॅप बनवण्यासाठी आयओटी टेक्नोलॉजीची मदत घेतली आहे. आमच्या सर्व डिलिव्हरी वाहनांना आयओटी सॉल्यूशनशी जोडण्यात आलं आहे, जो ऑर्डरची योग्यरित्या पूर्ति करेल आणि ट्रॅकिंग करेल. पुढील 6 ते 12 महिन्यात अन्य प्रमुख बाजार चंडीगढ, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकातामध्ये प्रवेश करण्याची योजना आहे.
फ्यूल डिलिव्हरी सर्विसमुळे काय होतील फायदे -
- हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईनसारख्या तेल विपणन कंपन्यांसह इंधन वितरण बाजार वेगाने विकसित होत आहे आणि या क्षेत्रातील काही स्टार्टअपशी जोडत आहे.
- या सेगमेंटमध्ये स्टार्टअपसाठी इंधन उद्योजक होण्याची क्षमता आहे. यामुळे ड्रायव्हर्स आणि हेल्पर्ससाठीही रोजगार उपलब्ध होईल.
- कोविड-19 च्या परिस्थितीत ग्राहकांसाठी हे फायद्याचं ठरेल. यामुळे इंधनासाठी पेट्रोल पंपवर लावाव्या लागणाऱ्या रांगा टाळता येतील आणि कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीद्वारे सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांचं पालनही होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Digital services, Online payments, Petrol and diesel, Tech news