मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alert! WhatsApp वर असा message आल्यास सावधान; एका क्लिकने होऊ शकतं मोठं नुकसान

Alert! WhatsApp वर असा message आल्यास सावधान; एका क्लिकने होऊ शकतं मोठं नुकसान

WhatsApp वर एका सर्व्हेमध्ये भाग घेऊन फ्री गिफ्ट जिंकण्याचा मेसेज आला असेल, तर सावध व्हा. हा एक मेसेज चांगलाच भारी पडू शकतो.

WhatsApp वर एका सर्व्हेमध्ये भाग घेऊन फ्री गिफ्ट जिंकण्याचा मेसेज आला असेल, तर सावध व्हा. हा एक मेसेज चांगलाच भारी पडू शकतो.

WhatsApp वर एका सर्व्हेमध्ये भाग घेऊन फ्री गिफ्ट जिंकण्याचा मेसेज आला असेल, तर सावध व्हा. हा एक मेसेज चांगलाच भारी पडू शकतो.

नवी दिल्ली, 25 मार्च : जर तुम्हाला WhatsApp वर एका सर्व्हेमध्ये भाग घेऊन फ्री गिफ्ट जिंकण्याचा मेसेज आला असेल, तर सावध व्हा. हा एक मेसेज चांगलाच भारी पडू शकतो. या मेसेजमुळे तुमचं बँक अकाउंट खाली होण्यासह पर्सनल डेटाही चोरी होण्याचा धोका आहे.

WhatsApp वर फॉर्वर्ड होणाऱ्या या मेसेजमध्ये लिहिलंय की, 'अ‍ॅमेझॉनची 30वी अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन...सर्वांसाठी गिफ्ट.' त्याशिवाय या मेसेजसह एक URL (https://ccweivip.xyz/amazonhz/tb.php?v=ss1616516) ही देण्यात आला आहे. मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या लिंकवर क्लिक करुन युजर्स फ्री गिफ्ट मिळवू शकतात.

सर्व्हे फॉर्ममध्ये मागितली जाईल महत्त्वाची माहिती -

या लिंकवर क्लिक केल्यानंतर एका सर्व्हे पेजवर आणलं जाईल. यात युजर्सला चार प्रश्न विचारले जातील, ज्यात दावा करण्यात आला आहे की, हे प्रश्न अ‍ॅमेझॉनची सर्विस इंप्रूव्ह करण्यासाठी विचारण्यात आले आहेत. हे प्रश्न युजर्सचं वय, लिंग, अ‍ॅमेझॉनची सर्विस कशाप्रकारे रेट केली आहे यासंबंधी असतात. तसंच यात युजर्सच्या डिव्हाईससंबंधीही प्रश्न विचारले जातात, की ते अँड्रॉईड फोनचा वापर करतात की आयफोनचा वापर करतात. तसंच लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी या पेजवर एक टायमरही चालवलं जातं.

(वाचा - WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीवर बंदी येण्याची शक्यता, सविस्तर चौकशी होणार)

सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर युजर्सच्या स्क्रिनवर अनेक गिफ्ट बॉक्स येतात. त्यानंतर सर्व्हेमध्ये भाग घेणाऱ्या 100 लकी विनर्सला Huawei Mate 40 Pro 5G स्मार्टफोन देण्याचा दावा केला जात आहे. येथून खरी ट्रिक सुरू होते. ज्यामध्ये युजर्सला हे क्विज 5 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स किंवा 20 पर्सनल चॅटवर पाठवण्याचं सांगितलं जातं. पण युजर्सला यात कोणत्याही प्रकारचं गिफ्ट मिळत नाही.

(वाचा - पुढील वर्षापासून बदलणार टोल कलेक्शनची प्रक्रिया, तुमच्यावर काय परिणाम होणार)

चुकूनही करू नका या गोष्टी -

मेसेजसह देण्यात आलेल्या लिंकमध्ये ज्याप्रमाणे गिफ्ट देण्याचा दावा केला जात आहे, तो पूर्णपणे फेक आहे. कोणतीही कंपनी कोणत्याही सर्व्हेमध्ये अशाप्रकारे गिफ्ट्स ऑफर करत नाही. अशा फसव्या गोष्टींपासून वाचण्यासाठी यूआरएल लिंकवर जरुर लक्ष द्या. असे URL स्कॅमर्सद्वारा तयार केले जातात, ज्याद्वारे युजर्सची माहिती मिळवली जाऊ शकेल. त्यामुळे अशा फ्री गिफ्ट्सच्या नादात मोठ्या फसवणूकीला बळी पडू नका.

First published:

Tags: Online crime, Online fraud, Tech news, Viral, Whatsapp alert, Whatsapp chat