मुंबई, 1 एप्रिल : स्मार्टफोन ही आता आपल्या रोजच्या गरजेची वस्तू झाली आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळे तर स्मार्टफोनच्या वापरात आणि उपयुक्ततेत अधिक वाढ झाली. सर्वसाधारणपणे 10 हजार रुपयांपर्यंतच्या 10 चांगल्या स्मार्टफोन मॉडेल्सची माहिती 'डिजिट डॉट इन'ने दिली आहे. या फोन्सचा परफॉर्मन्स, तसंच कॅमेरा, डिस्प्ले आदींची माहिती त्यात देण्यात आली आहे. या श्रेणीत शिओमी, मायक्रोमॅक्स, इंटेक्स, टेक्नो, कोमियो आदी कंपन्यांसह सॅमसंगसारख्या काही बड्या कंपन्यांच्या फोन्सचाही समावेश आहे. 10 हजारांपर्यंतचं बजेट असणाऱ्यांसाठी या टॉप 10 स्मार्टफोन्सच्या यादीतून त्यांची निवड करता येऊ शकेल.
1. शाओमी रेडमी 9 प्राइम (Xiaomi Redmi 9 Prime)
या फोनला 6.53 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला असून, त्याचं रिझॉल्युशन 2340 x 1080 पिक्सेल आहे. डिस्प्लेच्या टोकाला वरच्या बाजूला वॉटर ड्रॉप नॉच असून, त्यात सेल्फी कॅमेरा आहे. सेल्फी कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा असून, मुख्य कॅमेरे 13 + 8 + 5 + 2 मेगापिक्सेलचे आहेत. स्क्रीनला गोरिला ग्लास 3चं संरक्षण असून, नव्या ओरा 360 डिझाइनसह रिपल टेक्श्चर देण्यात आलं आहे. फोनचं वजन 198 ग्रॅम आहे. स्पेस ब्लू, मिंट ग्रीन, सनराइज फ्लेयर आणि मॅट ब्लॅक अशा चार रंगांत हे मॉडेल उपलब्ध आहे. चिपसेट मीडियाटेक हीलियो G80चा असून, प्रोसेसर ऑक्टाकोअर आणि Mali-G52 GPU आहे. हा फोन अँड्रॉइड 10वर आधारित MIUI 12 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. बॅटरीची क्षमता 5020 mAh आहे. फोनची रॅम 4 जीबी, तर इन-बिल्ट स्टोरेज 128 जीबी आहे. मायक्रो एसडी कार्डने ही क्षमता 512 जीबीपर्यंत वाढवणं शक्य आहे.
2. पोको M2 (POCO M2)
हा ड्युएल सिमचा फोन असून, अँड्रॉइड 10वर आधारित MIUI 12 वर काम करतो. या फोनला 6.53 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला असून, त्याचं रिझॉल्युशन 1080 x 2340 पिक्सेल आहे. स्क्रीनला गोरिला ग्लास 3चं संरक्षण देण्यात आलं आहे. चिपसेट मीडियाटेक हीलियो G80 SoC चा असून, प्रोसेसर ऑक्टाकोअर आणि Mali-G52 GPU आहे. 6GB LPDDR4x रॅम आहे, तर बॅटरीची क्षमता 5000 mAh आहे.
3. रिअलमी नार्झो 20 A (64 जीबी) REALME NARZO 20A 64GB
या फोनला 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला असून, त्याचं रिझॉल्युशन 1600 x 720 पिक्सेल आहे. डिस्प्लेच्या टोकाला वरच्या बाजूला वॉटर ड्रॉप नॉच असून, त्यात सेल्फी कॅमेरा आहे. सेल्फी कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा असून, मुख्य कॅमेरे 12 + 2 + 2 मेगापिक्सेलचे आहेत. स्क्रीनला गोरिला ग्लास 3चं संरक्षण आहे. फोनची जाडी 8.9 मिमी, तर वजन 195 ग्रॅम आहे. प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 असून, 3 जीबी/4 जीबी रॅम आणि 32 जीबी/64 जीबी स्टोरेजची सुविधा आहे. Realme UI आणि अँड्रॉइड 10 वर हा फोन काम करतो. फोनचं स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने 256 जीबीपर्यंत वाढवता येतं.
4. शाओमी रेडमी 9 (XIAOMI REDMI 9)
रेडमी 9 या फोनमध्ये 6.53 इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला असून, त्याच्या वरच्या टोकाला एक नॉच आहे. मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसरवर हा फोन चालतो आणि हायपर इंजिन गेम टेक्निकवर काम करतो. फोनच्या पाठीमागे ड्युएल कॅमेरा असून, त्यातला प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आहे. दुसरा कॅमेरा दोन मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा आहे. कॅमेरा फीचर्समध्ये AI सीन डिटेक्शन, AI सेल्फी, पोर्ट्रेट मोड आणि प्रो मोड यांचा समावेश आहे. बॅटरी क्षमता 5020 mAh असून, ऑक्टाकोअर प्रोसेसर आहे. रॅम चार जीबी आहे.
5. रेडमी 8A (REDMI 8A DUAL)
या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा डॉट नॉच HD+ डिस्प्ले असून, त्याचा आस्पेक्ट रेशो 19:9 आहे. फोनच्या स्क्रीनला गोरिला ग्लास 5चं संरक्षण आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 439 चिपसेटवर हा फोन काम करत असून, रॅम तीन जीबी, तर प्रोसेसर ऑक्टाकोअर आहे. बॅटरीची क्षमता 5000 mAh आहे. सेल्फी कॅमेरा AI तंत्रज्ञानावर आधारित 8 मेगापिक्सेलचा असून, पाठीमागे दोन कॅमेरे आहेत. त्यात 12 मेगापिक्सेलचा सोनी IMX 363 सेन्सर असून, अॅपर्चर f/1.8 आहे. त्यात ड्युएल पिक्सेल ऑटोफोकसची सोय आहे. दोन मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेराही आहे. AI पोर्ट्रेट शॉट घेण्याची सोय आहे.
6. रिअलमी नार्झो 10A (REALME NARZO 10A)
एंट्री लेव्हलचा हा फोन मॅट फिनिशचा असून, निळ्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले असून, वॉटर ड्रॉप नॉचमध्ये फ्रंट कॅमेरा आहे. गोरिला ग्लास 3चं संरक्षणही आहे. मीडियाटेक हीलियो G70 चिपसेट असून, प्रोसेसर ऑक्टाकोअर आहे. Mali-G52 ग्राफिक्सही सोबत देण्यात आलं आहे. तीन जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या या फोनची स्टोरेज क्षमता SD कार्डच्या साह्याने 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. अँड्रॉइड 10वर आधारित Realme UIवर हा फोन काम करतो. बॅटरी क्षमता 5000 mAhची आहे. फ्रंट कॅमेरा 12+2+2 असा असून, सेल्फी कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा आहे.
7. व्हिवो U10 (VIVO U10)
या फोनला 6.35 इंचाचा HD+ IPS डिस्प्ले असून, इलेक्ट्रिक ब्लू आणि थंडर ब्लॅक अशा दोन रंगांत तो सादर करण्यात आला आहे. बॅटरी क्षमता 5000 mAh असून, 18w फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665AIE प्रोसेसर असून, तो ऑक्टाकोअर आहे. गेमिंग परफॉर्मन्ससाठी अल्ट्रा गेम मोडही देण्यात आला आहे. फोनमध्ये डार्क मोडही आहे. फोनला पाठीमागे AI ट्रिपल कॅमेरा सेट असून, त्यात 13 + 8 + 2 मेगापिक्सेलचे कॅमेरे आहेत. सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे.
8. मोटरोला वन मॅक्रो (MOTOROLA ONE MACRO)
या स्मार्टफोनला 6.2 इंचाचा HD+ डिस्प्ले असून, त्याचं रिझॉल्युशन 1520×720 पिक्सेल आहे. वरच्या बाजूला वॉटर ड्रॉप नॉच असून, पाठीमागे फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. मीडियाटेक हीलियो P70 चिपसेट असून, ऑक्टाकोअर प्रोसेसर आहे. 4000 mAhची नॉन-रिमूव्हेबल बॅटरी असून, हा फोन अँड्रॉइड 9वर आधारित आहे. फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा असून, पाठीमागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. त्यात 13 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, दोन मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आणि दोन मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्स मिळते. हा फोन दोन जीबी रॅमचा आहे.
9. रेडमी 8 (64 जीबी) (REDMI 8 64GB)
या फोनला 6.22 इंचाचा मोठा डिस्प्ले असून, 720 x 1520 पिक्सेलचं HD+ रिझॉल्युशन आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला टोकाला डॉट नॉच आहे. पाठीमागे ड्युएल कॅमेरा सेटअप असून, तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित आहे. 12 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असून, त्याचं अॅपर्चर f/1.8 आहे. तो सोनीचा IMX363 इमेज सेन्सर आहे. दुसरा कॅमेरा दोन मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. तो पोर्ट्रेट शॉट्सला उपयोगी पडू शकेल. कॅमेरा फीचर्समध्ये AI सीन डिटेक्शन, गुगल लेन्स सपोर्ट देण्यात आलं आहे. सेल्फी कॅमेरा आठ मेगा पिक्सेलचा आहे. हा फोन चार जीबी रॅमचा असून, बॅटरी क्षमता 5000 mAh आहे. प्रोसेसर ऑक्टाकोअर आहे.
(हे वाचा: Poco X3 Pro भारतात लाँच, 48 MP कॅमेरासह जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या काय आहे किंमत )
10. रिअलमी सी3 (REALME C3)
या फोनला 6.5 इंचाचा HD+ स्क्रीन असून, वॉटरड्रॉप नॉच आहे. आस्पेक्ट रेशो 20:9 असून, स्क्रीन टू बॉडी रेशो 89.8 टक्के आहे. फोनच्या पाठीमागे सनराइज डिझाइन असून, फोन ब्लेझिंग रेड आणि फ्रोझन ब्लू या रंगांत उपलब्ध आहे. बॅक कॅमेरे 12 मेगापिक्सेल आणि दोन मेगापिक्सेलचे आहेत. प्रायमरी कॅमेरा 1080p व्हिडिओ रेकॉर्डिंग, HDR मोड, स्लो-मो व्हिडिओ आदी सुविधा देतो. सेल्फी कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा आहे. रॅम तीन जीबी असून, प्रोसेसर ऑक्टाकोअर आहे.
भारतात 10 हजार रुपयांच्या आत मिळणारे टॉप 10 फोन्स SELLER PRICE
Redmi 9 Prime amazon ₹10999
POCO M2 Tatacliq ₹14999
Realme Narzo 20A 64GB Tatacliq ₹9685
Xiaomi Redmi 9 N/A ₹9999
Redmi 8A Dual amazon ₹7999
Realme Narzo 10A flipkart ₹8999
Vivo U10 amazon ₹11990
Motorola One Macro flipkart ₹9999
Redmi 8 64GB HappiMobiles ₹10499
Realme C3 flipkart ₹7999
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Affordable, Budget, Realme, Redmi, Smart phone, Tech news, Vivo, Xiaomi