नवी दिल्ली, 20 जून : टाटा मोटर्सने (Tata Motors) देशातील सर्वात मोठा सोलर कारपोर्ट (Solar Carport) लावला आहे. टाटा मोटर्स आणि टाटा पॉवरने संयुक्तपणे पुण्यातील चिखलीमध्ये टाटा मोटर्स कार प्लांटमध्ये देशातील सर्वात मोठा ग्रिड-सिंक्रोनाईज्ड मीटर स्थापित केला आहे. टाटा पॉवरद्वारा सुरू करण्यात आलेल्या 6.2 मेगावॅट क्षमतेच्या सौर कारपोर्टमुळे दरवर्षी 86.4 लाख किलोवॅट क्षमतेची विज निर्माण होते आणि आणि वार्षिक 7000 टन कार्बन उत्सर्जन (carbon emission) आणि याच्या Life Cycle मध्ये 1.6 लाख टन कमी येण्याची आशा आहे.
ग्रीन एनर्जीसाठी मोठं पाउल -
जवळपास 30000 चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेल्या या कारपोर्टमुळे केवळ ग्रीन एनर्जीच निर्माण होणार नाही, तर प्लांटमध्ये तयार कारसाठी कवर्ड पार्किंगही उपलब्ध होईल. 2039 साठीचं शून्य कार्बन लक्ष्य ठेवून हे पाउल उचलण्यात आलं आहे. टाटा मोटर्सने 31 ऑगस्ट 2020 ला टाटा पॉवरसह एक विज खरेदी करार केला आहे. कोरोनाचं आव्हान असूनही कंपन्यांनी 9.5 महिन्याच्या रेकॉर्ड वेळेत या कारपोर्टच्या पायाभूत सुविधा यशस्वीरित्या विकसित केल्या आहेत.
100 टक्के Renewable Energy वर भर -
टाटा मोटर्सचे पॅसेंजर व्हिकल बिजनेस यूनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी सांगितलं, की आम्ही उर्जेची बचत करण्याच्या गरजेबद्दल नेहमीच तत्पर असून 100 टक्के Renewable Energy प्राप्त करण्यास वचनबद्ध आहोत.
टाटा पॉवरशी आमची भागीदारी म्हणजे भारतातील सर्वात मोठी सौर कारपोर्ट तैनात करणं आणि त्यासाठी पुण्यातील प्लांट त्याच दिशेने एक पाउल आहे, असं सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Tata group