नवी दिल्ली, 20 जून : काही दिवसांपूर्वी 17 लग्जरी कार्सवर बुलडोझर चालवून कार नष्ट करण्यात आल्या होत्या. हा प्रकार फिलीपींसमधील असल्याचं समोर आलं. फिलीपींसमध्ये तस्करी करुन आणलेल्या लग्जरी कार तेथील सरकारने मोठी कारवाई करत बुलडोझर चालवून चक्काचूर केल्या. सोशल मीडियावर या गोष्टींची मोठी चर्चा सुरू आहे. अनेक जण अशाप्रकारे कार नष्ट करण्याबाबत विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेक जण कार अशा नष्ट करण्यापेक्षा त्यांचा लिलाव करायला हवा होता, अशा प्रतिक्रिया देत आहेत. आता कारवाई करत फिलीपींस सरकारने पुन्हा 21 कार्स बुलडोझरने नष्ट केल्या. बुलडोझरद्वारे नष्ट केलेल्या कार्सची किंमत भारतीय चलनात जवळपास 9 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. फिलीपींस सरकारद्वारे नष्ट केलेल्या या गाड्यांमध्ये अनेक लग्जरी ब्रँड Porsche 911, Bentley Flying Spur आणि McLaren 620R सारख्या महागड्या गाड्यांशिवाय मर्सिडीज SLK, लोटस एलिस, मॉडिफाइड हुंजई जेनेसिस कूपे, टोयोटा सोलारा, आणि14 मित्सुबिशी जीप सारख्या टॉप ब्रँड गाड्या सामिल होत्या.
(वाचा - देशातील सर्वात स्वस्त कार वेरिएंट, जबरदस्त फीचर्ससह मिळेल 22 किमीपर्यंतच मायलेज )
यापूर्वी फिलीपींस सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला 17 आणखी तस्करी केलेल्या गाड्यांवर बुलडोझर फिरवनू त्या नष्ट केल्या होत्या. त्यावेळीदेखील नष्ट केलेल्या अनेक गाड्यांमध्ये महागड्या आणि लग्जरी ब्रँड फरारी 360 स्पाइडर, आणि लेम्बोर्गिनी गेलार्डो आणि बीएमडब्ल्यू Z1 सारख्या गाड्या होत्या.
𝗕𝗢𝗖 𝗗𝗲𝘀𝘁𝗿𝗼𝘆𝘀 𝟮𝟭 𝗦𝗺𝘂𝗴𝗴𝗹𝗲𝗱 𝗩𝗲𝗵𝗶𝗰𝗹𝗲𝘀https://t.co/3Rwd9vHBoh pic.twitter.com/a8A5PcpKJA
— Bureau of Customs PH (@CustomsPH) June 18, 2021
(वाचा - आता कारसारखीच बाईकही राहणार सुरक्षित, ट्रॅक करता येणार लोकेशन! )
फिलीपींसचे राष्ट्रपती रोड्रिगो रोओ दुतेर्ते सत्तेत आल्यानंतर भ्रष्ट्राचारविरोधात कडक कारवाई करत आहेत. ब्युरो ऑफ कस्टम्सने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व गाड्या वेगवेगळ्या पद्धतीने तस्करीकरुन फिलीपींसमध्ये आणण्यात आल्या होत्या. या सर्व गाड्या 2018 ते 2020 दरम्यान जप्त करण्यात आल्या होत्या. वाहनांचा लिलाव न करता, गाड्या नष्ट करणं हे तस्करीविरुद्ध कठोर पाउल असल्याचं सांगितलं जात आहे.