TATA ची सगळ्यात सुरक्षित आणि स्वस्त कार 5.29 लाख रुपयात, जाणून घ्या फीचर्स

TATA ची सगळ्यात सुरक्षित आणि स्वस्त कार 5.29 लाख रुपयात, जाणून घ्या फीचर्स

स्वस्तात मस्त कार घेण्याचा विचार कर असात तर हा पर्याय चांगला आहे.

  • Share this:

टाटा मोटर्सचा कार Tata Altroz ची दीड महिन्यापासून चर्चा होत आहे मागच्या वर्षी 3 डिसेंबरला टाटा मोटर्सने Altroz गाडी लाँच केली होती. त्यानंतर पुढच्या काहीच दिवसांमध्ये सुरक्षित कार म्हणून Tata Altrozनं मान मिळवला. आज पुन्हा Altroz कार लाँच करण्यात आली आहे. किंमत आणि सिक्युरिटी सेटिंगचा विचार करता टाटाची ही गाडी खूप शानदार आहे. ह्या गाडीचे फीचर्स आणि किंमत दोन्ही गोष्टी जाणून घेऊया.

Tata Altroz या गाडीच्या वेरियंटचा विचार केला तर XZ(O), XZ, XT, XM आणि XE अशा वेरियंटमध्ये ही गाडी उपलब्ध होणार आहे. पेट्रोल आणि डिझेल असे या गाडीमध्ये दोन्ही इंजिनचे पर्याय देण्यात आले आहेत. या कारमधील टॉप वेरियंटमध्ये स्ट्रीट गोल्ड, डाउनटाउन रेड. एवेन्‍यू व्‍हाइट कलर उपलब्ध असणार आहे. इंजिनचा विचार केला तर दोन पर्याय आहेत. टियागो इंजिनमध्ये 1.2-लीटर पेट्रोलची कपॅसिटी देण्यात आली आहे. दुसरा नेक्सॉन 1.5 लीटर डिजेल इंजिन देण्यात आलं आहे. दोन्ही इंजीन सोबत 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स स्टँडर्ड देण्यात आलं आहे.

हेही वाचा-फोर्डची नवी EcoSport, BS6 इंजिनसह अशी आहेत फीचर्स आणि किंमत

दिल्लीत प्रीमियम हॅचबॅक Tata Altroz गाडीची किंमत 5.29 लाख रुपये आहे. तर टॉप वेरियंटची किंमत 9.39 लाख रुपये एवढी आहे. तुम्ही 21 हजार रुपये भरून या गाडीचं प्री बुकिंगही करू शकता. त्यासाठी तुम्हाला https://bookonline.tatamotors.com/altroz/#/variant या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. त्यानंतर बुकिंग करू शकता याशिवाय जवळच्या शोरूममधूनही तुम्ही बुकिंग करू शकता. टाटा कंपनीची सुरक्षित कार म्हणून या कारला 5 रेटिंग देण्यात आले आहेत. नेक्सॉन ग्लोबल NCAP कडून क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5 स्टार देण्यात आले होते.

या गाडीमध्ये तुम्हाला ऑटो हेडलँप, कीलेस एन्ट्री, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, 7 इंच डुअल टोन एलॉय व्हिल, प्रोजेक्टर हेडलँप, एलईडी डीआरएलस, क्रूज कंट्रोल सारख्या सेवा मिळणार आहेत. यासेबर रियर पार्किंग सेंसरसोबत कॅमेराही गाडीमध्ये देण्यात आला आहे. त्यामुळे पार्किंग करण अधिक सोप होईल. अशा पद्धतीची वेगवेगळ्या अत्याधुनिक टेक्नोलोजी आणि सेवांनी युक्त स्वस्तात बजेटमध्ये बसणारी ही कार घेण्याचा विचार करत असाल तर बुकिंग सुरू झाले आहेत.

हेही वाचा-HONOR MagicWatch 2 स्मार्टवॉच सगळ्यांनाच का आवडतंय?

First published: January 31, 2020, 8:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading