मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

HONOR MagicWatch 2 स्मार्टवॉच सगळ्यांनाच का आवडतंय?

HONOR MagicWatch 2 स्मार्टवॉच सगळ्यांनाच का आवडतंय?

HONOR नं नुकतंच HONOR MagicWatch 2 लॉन्च केलंय. काय आहे याची खासीयत?

HONOR नं नुकतंच HONOR MagicWatch 2 लॉन्च केलंय. काय आहे याची खासीयत?

HONOR नं नुकतंच HONOR MagicWatch 2 लॉन्च केलंय. काय आहे याची खासीयत?

    HONOR सुरुवातीपासून आपल्या ग्राहकांसाठी शानदार स्मार्टफोन्स घेऊन येते आणि TechChic ब्रँडच्या रूपात आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येक लॉन्चमध्ये काही नवं घेऊन येते. याच परंपरेला पुढे नेत HONOR नं नुकतंच HONOR MagicWatch 2 लॉन्च केलंय. HONOR सुरुवातीपासून आपल्या ग्राहकांसाठी शानदार स्मार्टफोन्स घेऊन येते आणि TechChic ब्रँडच्या रूपात आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येक लॉन्चमध्ये काही नवं घेऊन येते. याच परंपरेला पुढे नेत HONOR नं नुकतंच HONOR MagicWatch 2 लॉन्च केलंय. आपल्या आधीच्या स्मार्टवॉच माॅडेलला अपग्रेड करून HONOR ने यावेळी 46mm चं HONOR MagicWatch 2 लॉन्च केलंय. आपण पाहू याचा रिव्ह्यू. डिझाइन HONOR MagicWatch 2 दोन खास रंगात उपलब्ध आहे. चारकोल ब्लॅक आणि फ्लॅक्स ब्राउन. या स्मार्टवॉचची बॉडी स्टेनलेस स्टीलची आहे. सोबत याचा AMOLED डिस्प्ले 4.8 cms (1.39 इंच)चा आहे. याशिवाय वजन 41 ग्रॅम इतकं कमी असल्यानं हे फ्लेक्सिबल आणि वापरायला सहज-सोपं आहे. इतकंच नाही तर तुम्ही तुमच्या पसंतीनुसार याचा वॉच फेस बदलू शकता. यात तुम्ही तुमच्या कुटुंबाचा फोटो किंवा अजून कुठला फोटो डाऊनलोड करून स्क्रीन डिस्प्लेमध्ये लावू शकता. एकापेक्षा जास्त फोटो पसंत असतील तर डिस्प्लेला स्लाइडशोही करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या घडाळ्याचा or पाहाल तेव्हा डिस्प्ले पिक्चरमध्ये बदल होईल. 454X454 च्या रिझोल्युशनमुळे तुम्हाला चांगली क्ल्यारिटीही मिळेल. घडाळ्याची बॉडी 316L स्टेनलेस स्टीलची आहे. त्यामुळे घड्याळ मजबूत असूनही नाजुक आणि फॅशनेबलही आहे. म्हणूनच अनेक प्रसंगी तुम्ही हे घड्याळ आपल्या मित्रमैत्रिणींसमोर मिरवू शकता. बॅटरी 2 तास चार्जिंग केल्यानंतर HONOR MagicWatch 2 तुम्हाला 14 दिवसाचं बॅटरी लाइफ देतं. हे इंडस्ट्री स्टँडर्डपेक्षा किती तरी पट चांगलं बॅटरी लाइफ आहे. आता तुमचं स्मार्टवॉच चार्जिंग डॉकपेक्षा जास्त तुमच्या हातावरच खुलून दिसेल आणि 24X7 तुमच्या आरोग्याकडे लक्ष देईल. वॉटर रेसिस्टंट हे घड्याळ पाण्याच्या खालीही तुमचा हार्ट रेट सांगतं. म्हणजे समजा तुम्ही हे घड्याळ घालून स्वीमिंग करत असाल तर हा हार्ट रेटबरोबर तुमचा स्विम स्ट्रोकही ऑटो डिटेक्ट करतं. आणि सोबत तुम्हाला SWOLF स्कोर आणि तुम्ही किती कॅलरीज बर्न केल्या हेही सांगतं. हे घड्याळ 5ATM वॉटर रेसिस्टेंट आहे आणि 50 मीटर खोल पाण्यातही ते तुमची साथ सोडणार नाही. तुम्ही हे घड्याळ घालून चुकून आंघोळीला गेलात तरीही काही फरक पडणार नाही. वॉटर स्पोर्टस करतानाही हे तुमचं फिटनेस मॉनिटरिंग करेल. HONOR MagicWatch 2 एक युनिसेक्स वॉच आहे. स्त्री-पुरुष दोघंही ते वापरू शकतात. HONOR MagicWatch 2 आपल्या दैनंदिन आयुष्यात समाविष्ट होऊ इच्छितं. म्हणूनच ते 15 फिटनेस मोडला सहकार्य करतं. यात 8 ऑउट-डोर आणि 7 इन-डोर स्पोर्ट्स आहेत, जसे रनिंग, हाईकिंग, साइक्लिंग, स्वीमिंग वगैरे. तुम्ही किती कॅलरीज बर्न केल्यात, आता किती करायचीय आणि दिवसभरच्या कामाचा आपल्या प्रकृतीवर काय परिणाम झालाय, याचे मोफत सल्ले हे घड्याळ देतं. याशिवाय या HONOR MagicWatch 2 मध्ये तुम्हाला 13 विविध रनिंग कोर्सबरोबर टाइम वॉइस ओवर गाइडन्सही मिळतो. हेल्थ मॉनिटरिंग हे स्मार्टवॉच तुमच्या प्रकृतीकडे व्यवस्थित लक्ष देतं आणि काळजी घेतं. मग तुमचा हार्ट रेट असो नाही तर स्ट्रेस लेव्हल. याच्या हार्ट रेट मॉनिटर फीचरमध्ये HUAWEI TruSeen™ 3.5, AI एल्गोरिदम आणि इनोवेटिव लाइट पाथ टेक्नोलोजी वापरलीय. त्यामुळे हे स्मार्टवॉच 24 तास हार्ट रेट मॉनिटर करतं. यातला स्लिप मॉनिटर HUAWEI TruSleep™ 2.0, हा झोप न येण्याची कारणं शोधून तुम्हाला 200 हून जास्त उपाय सांगतो. याच्या स्ट्रेस मॉनिटरमध्ये असलेल्या HUAWEI TruRelax™ मुळे तुम्ही दिवसभराचा स्ट्रेस लेवल मॉनिटर करून चांगली लाइफस्टाइल मिळवू शकता. स्मार्ट फीचर्स हल्ली आपल्या लाइफस्टाइल एकदम फास्ट झालीय. आपल्याला सगळ्या गोष्टी लगेच हव्या असतात. या स्मार्टवॉचमुळे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनगटावर असेल. मग SMS, ईमेल, कॅलेंडर वगैरेंचं नोटिफिकेशन असो किंवा कॉल, तुम्ही तुमच्या स्मार्टवॉचला तुमच्या फोनशी कनेक्ट करू शकता. याची आणखी एक खासीयत आहे. ती म्हणजे तुम्ही 150 मीटर दूरूनही ब्लूटुथद्वारे हेडफ़ोन बिल्ट-इन माइक वापरून कॉल घेऊ शकता. हे स्मार्टवॉच तुमच्या एंटरटेनमेंटचाही विचार करतं. यात तुम्ही 500 गाणी स्टोअर करून प्ले करू शकता. याच्या मदतीनं तुम्ही फक्त स्मार्टवॉचमध्येच नाही, तर तुमच्या फोनमधली गाणीही कंट्रोल करू शकता. यात GPS ची सुविधाही आहे. त्यामुळे हे खराब हवामान, जंगल आणि शहरात चांगली कामगिरी करू शकतं. किंमत HONOR MagicWatch 2 च्या चारकोल ब्लॅक माॅडेलची किंमत 12,999 रुपये आहे तर फ्लॅक्स ब्राउन कलर वॉच तुम्ही 14,999 रुपयात खरेदी करू शकता. HONOR MagicWatch 2 18 जानेवारीपासून Amazon Primeच्या मेंबर्ससाठी आणि 19 जानेवारीपासून नॉन-मेंबर्ससाठी उपलब्ध आहे. हे स्मार्टवॉच खरेदी करणाऱ्यांना HONOR Sport ब्लूटूथ इयरफोन स्टॉक संपेपर्यंत मोफत मिळेल. या ऑफरचा लाभ तुम्ही 22 जानेवारीपर्यंत घेऊ शकता. वॉचबरोबर सहा महिन्यांची नो कॉस्ट EMI ही मिळतेय. सोबत SBI च्या कार्डावर पेमेंट केल्यावर 10 टक्के सूटही मिळेल. निष्कर्ष या स्मार्टवॉचनं आरोग्य, फिटनेस, एंटरटेनमेंट या लाइफस्टाइलची काळजी घेतलीच आहे, शिवाय अॅडवेंचरकडेही लक्ष दिलंय. हे अशा प्रकारे डिझाइन केलंय की स्त्री-पुरुष दोघंही ते घालू शकतात. चांगल्या फीचर्सबरोबर याचा कलर स्टाइलिश आहे. तुमच्या स्टाइल स्टेटमेंटशी ते मिळतंजुळतं आहे. HONOR MagicWatch 2 सगळ्यांसाठी आहे. तेव्हा आता वेळ दवडू नका आणि HONOR MagicWatch 2 बुक करा आणि नवीन वर्षात सुरू करा तुमची फिटनेस जर्नी. (This is a partnered post)
    Published by:Arundhati Ranade Joshi
    First published:

    पुढील बातम्या