नवी दिल्ली, 1 सप्टेंबर : व्यवसायासाठी एखादी गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध आहे. टाटा मोटर्सने (Tata Motors) टाटा ऐस गोल्ड पेट्रोल सीएक्स (Tata Ace Gold Petrol CX) ही गाडी लाँच केली आहे. Tata Ace Gold Petrol CX ची किंमत 3.99 लाख रुपये आहे. परंतु ही गाडी केवळ 36 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटमध्ये खरेदी करता येऊ शकते. तसंच 7500 रुपयांच्या EMI वरही हा टेम्पो खरेदी करता येऊ शकतो. Tata Ace Gold Petrol CX चे अनेक फायदे - ही गाडी अतिशय आरामदायी, सुरक्षित आणि मजबूत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. Tata Ace चा परफॉरमन्स चांगला असून अधिक लोडची क्षमताही आहे. काही मोठे रिपेअर आल्यास Tata Zippy कडून 24 तासांच्या आत ते दुरुस्त करण्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. Tata Alert कधीही, कुठेही सर्विस देतं आणि 24 तासांत दुरुस्तीचीही गॅरंटी दिली जाते.
आता RTO जाण्याची गरज नाही, घरबसल्या सोप्या स्टेप्सने Renew करा Driving Licence
अपघात झाल्यास, Tata Kavach इन्शोरन्ससह 15 दिवसांच्या आत रिपेअर गॅरंटी देण्यात आली आहे. असं न झाल्यास, दर दिवसाच्या हिशोबाने 500 रुपयांची नुकसान भरपाईही दिली जाते. Tata Ace सह 10 लाखांचा Tata सुरक्षित इन्शोरन्स आणि 50000 मेडिक्लेम इन्शोरन्स मिळतो.
Royal Enfield Classic 350 लाँच, काय आहेत फीचर्स आणि किंमत
या गाडीसाठी कधीही घरबसल्या बुकिंग करता येतं. अधिक माहिती https://bookonline.tatamotors.com/cv/#/home या लिंकवर डिटेल्स घेऊ शकता.