नवी दिल्ली, 1 सप्टेंबर : गाडी चालवताना नियमांनुसार प्रत्येकाकडे सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. चेंकिंगवेळी अनेकदा गाडीच्या RC, लायसन्ससह इतरही डॉक्युमेंट विचारले जातात. अनेकांकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) नसल्याने किंवा बाहेर पडताना ते सोबत नसल्याने मोठा दंड भरावा लागू शकतो.
ड्रायव्हिंग लायसन्स 20 वर्ष वैध असतं आणि त्यानंतर ते रिन्यू करावं लागतं. ड्रायव्हिंग लायसन्स एका वर्षाच्या आत रिन्यू न केल्यास, नवं लायसन्स बनवावं लागू शकतं. नव्या लायसन्सवेळी पुन्हा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स वेळीच रिन्यू करणं गरजेचं (Driving Licence Renew) आहे. घरबसल्या सोप्या पद्धतीने ऑनलाईन ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
काही महिन्यांपूर्वी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करत लायसन्ससंबंधी कॉन्टॅक्टलेस सर्विसेज सांगितल्या होत्या, ज्यात ड्रायव्हिंग लायसन्स रिन्युअलसह आधार ऑथेंटिकेशनद्वारे फायदा घेतला जाऊ शकतो. आता लायसन्स रिन्यू करण्यासाठी RTO जाण्याची गरज नसून हे काम घरबसल्या करता येणार आहे.
- सर्वात आधी https://parivahan.gov.in/ यावर क्लिक करुन परिवहन सेवेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
- होमपेजवर ऑनलाईन सर्विसवर क्लिक करुन, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधित सर्विसेज सिलेक्ट करा.
- त्यानंतर नवीन पेजवर आपल्या राज्याचं नाव निवडावं लागेल.
- पुन्हा नवं पेज ओपन होईल, इथे ‘Apply for DL Renewal’ पर्याय निवडावा लागेल.
- अर्ज सबमिट करण्यासाठीचं एक पेज येईल, इथे अर्ज भरावा लागेल.
- आता आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागतील.
- त्यानंतर एक फोटो आणि सही अपलोड करण्याचं सांगितलं जाईल.
- आता फी भरण्यासाठी सांगितलं जाईल आणि पेमेंट वेरिफाय करावं लागेल. फी भरल्यानंतर रिसिप्ट प्रिंट किंवा डाउनलोड करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.