नवी दिल्ली , 1 सप्टेंबर : रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 भारतीय कंपनीच्या पोर्टफोलियामध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकपैकी एक आहे. बुलेट म्हणून प्रसिद्ध असलेल्या या बाईकचं न्यू जनरेशन कंपनीने लाँच केलं आहे. 1 सप्टेंबर रोजी कंपनीने याचं अधिकृत लाँचिंग केलं आहे. Royal Enfield Classic 350 पूर्णपणे नव्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे. Royal Enfield Classic 350 कंपनीने नव्या J-Platform वर डेव्हलप केली आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर कंपनीने Royal Enfield Meteor 350 मध्ये केला आहे. कंपनीची ही नवी बाईक G2 मॉडेलपासून इंस्पायर्ड आहे. या बाईकच्या हँडलँड डिझाइनपासून फ्लूल टँक, मडगार्ड, कलर कॉम्बिनेशन आणि डिस्क ब्रेकपर्यंत क्लासिक लूक रिफ्रेश केला गेला आहे. त्यामुळे ही बाईक पूर्णपणे नवी ठरते. शहरातील रस्त्यांपासून ते अॅडव्हेंचर टूरिजम लक्षात घेता बुलेट बनवण्यात आली आहे.
As we unveil our all-new motorcycle, you stand a chance to win a secret gift. All you have to do is watch our live launch on 01.09.21, screenshot the motorcycle when it appears and mail it to us at bereborn@royalenfield.com
— Royal Enfield (@royalenfield) August 30, 2021
Visit:https://t.co/2h2rMH3uWD#BeReborn #RoyalEnfield pic.twitter.com/2stCfcEm89
नव्या क्लासिक 350 मध्ये Meteor 350 cruiser प्रमाणे 349cc फ्लूल इंजेक्टेड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 20.2bhp पर्यंत पॉवर आणि 27Nm पर्यंत टॉर्क जनरेट करतं. 5 स्पीड गियरबॉक्ससह कंपनीच्या नव्या J आर्किटेक्चरवर बुलेट डेव्हलप करण्यात आली आहे.
35 हजारात खरेदी करा 1 लाखहून अधिक किंमत असणारी Bajaj Pulsar 180बाईक,पाहा डिटेल्स
New Royal Enfield Classic 350 ची किंमत 1.80 लाख रुपयांपासून सुरू होते. टॉप मॉडेल 2.06 लाख रुपयांपर्यंत आहे.