मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /OMG! तब्बल 4 कोटींना विकला गेला Super Mario; या गेममध्ये असं काय आहे वेगळं?

OMG! तब्बल 4 कोटींना विकला गेला Super Mario; या गेममध्ये असं काय आहे वेगळं?

1986 मध्ये सुपर मारिओ गेम (Super Mario Game) एका कपाटात ठेवला होता, ज्याचा आता लिलाव झाला आहे.

1986 मध्ये सुपर मारिओ गेम (Super Mario Game) एका कपाटात ठेवला होता, ज्याचा आता लिलाव झाला आहे.

1986 मध्ये सुपर मारिओ गेम (Super Mario Game) एका कपाटात ठेवला होता, ज्याचा आता लिलाव झाला आहे.

डलास, 04 एप्रिल :  सुपर मारिओ गेम (Super Mario Game). आपल्यापैकी प्रत्येकाला हे नाव परिचयाचं आहे. फक्त लहानपणातच नाही तर अगदी मोठे झाल्यानंतरही खूप जण हा गेम खेळले असतील. त्यावेळी तुम्ही अवघ्या काही रुपयांत खरेदी केलेला हा गेम कोट्यवधी रुपयांना विकला गेला, असं सांगितलं तर... साहजिकच तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.

डलासमध्ये सुपर मारिओ गेम चक्क लाख 60 हजार डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांनुसार तब्बल 4 कोटी 84 लाख रुपयांना विकला (Super Mario Game Auction) गेला आहे. डलासमधील हेरिटेज ऑक्शन हाऊसमध्ये (heritage auction house) या गेमचा लिलाव (auction) करण्यात आला.

हे वाचा - Mobile आणि Smartwatch संबंधित या खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

निन्तेंन्दोचा (Nintendo) सुपर मारियो हा गेम 35 वर्षांपूर्वी ख्रिसमस गिफ्ट (Christmas gift) म्हणून खरेदी करण्यात आला होता.  1986 मध्ये गेम खरेदी केल्यानंतर तो एका कपाटात ठेवला होता. कपाटात हा गेम प्लॅस्टीकच्या रॅपरमध्ये ठेवण्यात आला होता.  गेम कपाटातच होता आणि हे समजल्य़ानंतर आता त्या गेमचा लिलाव करण्यात आला आहे. लिलावात आणण्यापर्यत त्याचे टॅग तसेच होते. लिलावात आणलेला हा सर्वोत्तम गेम असल्याचे हेरिटेज ऑक्शन हाऊसने सांगितले. या गेमला

हे वाचा -  Second hand laptop घेताय; फक्त वरून चांगला दिसतो म्हणून भुलू नका, तपासून पाहा हे भाग

सुपर मारियो ब्रदर्स हा गेम 13 सप्टेंबर 1985 ला पहिल्यांदा समोर आला होता. निन्तेंन्दोने हा गेम तयार केला होता. फोर्ब्स (forbs) च्या रिपोर्टनुसार सुपर मारियो ब्रदर्स हा पहिला असा व्हिडीओ गेम आहे ज्याला लिलावात इतकी मोठी रक्कम मिळाली आहे. हा असली गेमचं संशोधित स्वरुप आहे. याआधी महागड्या व्हिडीओ गेमचा रेकॉर्ड सुपर मारियो ब्रदर्सच्या नावावर होता. जो जुलै 2020  मध्ये झाला होता. तर त्याला 1 लाख 14 हजार डॉलर (doller) इतकी रक्कम मिळाली होती.

First published:

Tags: Auction, Technology