मुंबई, 04 एप्रिल : सध्या सर्व व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. तुमचं ऑफिस असो, तुमच्या मुलांची शाळा असो की तुमच्या पत्नीच्या मैत्रिणींची पार्टी सगळ्यात सहभागी होण्यासाठी तुम्हाला हवा असतो डेस्कटॉप किंवा लॅपटॉप (Laptop) आणि एक इंटरनेट कनेक्शन. आता घरात किमान दोन कॉम्प्युटर असणं ही गरज झाली आहे. त्यामुळे बहुतेक जण सेकंड हँड लॅपटॉप म्हणजेच वापरलेला लॅपटॉप (Second Hand Laptop) घेत आहेत. सेकंड हँड लॅपटॉप हा काही काळ वापरलेला असतो. त्यामुळे कदाचित त्यामध्ये काही समस्या असू शकते. त्यामुळे लॅपटॉप वरवर चांगला दिसतो म्हणून भुलून जाऊ नका. तर लॅपटॉपचा प्रत्येक भाग नीट तपासून पाहा. आता लॅपटॉप घेताना नेमकं काय काय तपासायला हवं, कोणते पार्ट किंवा भाग तपासायला हवेत ते पाहुयात. लॅपटॉपची बॉडी तपासा वापरलेला लॅपटॉप घेताना त्याच्या बॉडीला (Body of Laptop) कुठेही धक्का लागलेला नाही ना हे तपासा. स्क्रीन किंवा बॉडीवर ओरखडे नाहीत ना हे पण बघून घ्या. त्याचा दर्जा व्यवस्थित बघा. बरेचदा तो आधी हातातून पडलेला असतो आणि विकणारा थोड्या सुधारणा करून तो विकतो पण त्याचा फटका वापरलेला लॅपटॉप घेणाऱ्याला बसतो. लॅपटॉपचा किबोर्ड तपासून घ्या जुना लॅपटॉप घेताना त्याचा किबोर्ड (keyBoard) तपासून घ्या. तो किती वापरला गेला आहे हे तुम्हाला लक्षात येईलच पण तो तुम्ही 10 मिनिटं वेळ काढून एक परिच्छेद टाइप करून बघा आणि नंतरच निर्णय घ्या. बोर्डची सगळी बटणं दाबून बघा. हे वाचा - डेटा चोरीची भीती?Account डिलीट न करताही सेफ ठेवू शकता Facebookवरची पर्सनल माहिती एखादं बटण निखळलेलं किंवा दाबलंच जात नाही असंही होऊ शकतं. त्यामुळे त्याचा वेगळा खर्च तुम्हाला करावा लागेल. सगळे पोर्ट बघून घ्या लॅपटॉपला असलेले सगळे पोर्ट व्यवस्थित काम करत आहेत ना हे तपासा. पेन ड्राइव्ह, एचडीएमआय पोर्ट (HDMI Port) सर्व नीट बघून घ्या. जेणेकरून नंतर नुकसान नको. हा पोर्ट फार महत्त्वाचा असतो आणि तो बदलत बसणं त्रासाचं असतं. बॅटरी तपासणं खूप महत्त्वाचं लॅपटॉपची बॅटरी बाहेर काढता येत असेल तर काढून बघा म्हणजे ते सॉकेट व्यवस्थित आहे का कळतं आणि बॅटरीला काही डॅमेज नाही ना हे पण लक्षात येतं. बॅटरीचा दर्जा तपासताना बॅटरी किती काम केल्यावर किती वेळ चालते याचा अंदाज घ्या. जर ती एचडी क्वालिटीचा व्हिडिओ पाहताना 15 मिनिटांत 50 टक्के संपली तर तो लॅपटॉप घेऊ नका. हे वाचा - नवीन मोबाईल घ्यायचाय? हे आहेत 6 हजार रुपयांच्या आतले बजेट स्मार्टफोन चांगल्या स्थितीतला आणि उत्तम वैशिष्ट्यांचा वापरलेला लॅपटॉप नक्की मिळतो. आपल्याला देणारा योग्य मिळायला हवा. अनेकदा आयटी कंपनीतील कर्मचारी नवा लॅपटॉप घेतात आणि काही कारणास्तव त्यांना तो लगेच विकायचा असतो असा लॅपटॉप मिळाला तर शोधा कारण तो त्या व्यक्तींनी खूप विचार करून घेतलेला असतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण तपासल्या की झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.