जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Mobile आणि Smartwatch संबंधित या खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Mobile आणि Smartwatch संबंधित या खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Mobile आणि Smartwatch संबंधित या खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

स्मार्टफोन (Smartphone) घेताना तुम्ही IP रेटिंग किंवा ATM रेटिंग पाहिलं आहे का?

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 3 एप्रिल : स्मार्टफोन (Smartphone) घेताना तुम्ही IP रेटिंग किंवा ATM रेटिंग पाहिलं आहे का? बहुतांश बड्या कंपन्या आज आपल्या फोनचं IP रेटिंगही देतात; पण तुम्हाला त्याचा अर्थ माहिती आहे का? ते कोण नियंत्रित करतं आणि स्मार्टफोनच्या रेटिंगमध्ये IP नंतर येणाऱ्या डिजिट्सचा अर्थ काय होतो, हे तुम्हाला माहिती आहे का? तीच माहिती आपण पाहू या. वॉटरप्रूफ टेक्नॉलॉजी (Waterproof) किंवा डस्ट फ्री टेक्नॉलॉजी (Dust Free) अलीकडे ट्रेंडिंग आहे. अॅपलव्यतिरिक्त (Apple) शियोमीनेही (Xiaomi) अलीकडेच सादर केलेली आपली प्रॉडक्ट्स वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असल्याचं जाहीर केलं आहे. IP रेटिंग याच दोन गोष्टी निर्धारित करतं. ही रेटिंग्ज इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स कमिशनद्वारे (International Electronics Commission -IEC) निश्चित केली जातात. IP चा फुल फॉर्म Ingress Protection किंवा International Protection असा होतो. हे ही वाचा- Gmail यूजर्ससाठी आनंदाची बातमी; जूनपर्यंत ‘ही’ सेवा मिळणार फ्री या रेटिंगमध्ये दोन क्रमांक असतात. पहिला आकडा स्थायू पदार्थांपासून म्हणजेच धूळ, घाण, स्क्रॅचेस यांपासून फोन किती सुरक्षित आहे हे दर्शवतो. याची रेंज 1 ते 6 या आकड्यांच्या मर्यादेत असते. दुसरा आकडा द्रव पदार्थांपासून म्हणजेच पाण्यापासून फोन किती सुरक्षित आहे, हे दर्शवतो. याची रेंज 1 ते 8 या आकड्यांच्या मर्यादेत असते. यावरून, तुमच्या फोनचं रेटिंग IP67 असेल, तर तुमचा फोन स्थायू आणि द्रव अशा दोन्ही पदार्थांपासून संरक्षित आहे, हे कळतं. या रेटिंगवरून असं लक्षात येतं, की तुमचा फोन पाण्यात तीन फुटांपर्यंतच्या खोलीवर 30 मिनिटांपर्यंत सुरक्षित राहू शकतो. IP68 रेटिंग असलेले फोन पाण्यात पाच फुटांपर्यंतच्या खोलीत 30 मिनिटांपर्यंत सुरक्षित राहू शकतात. अर्थात, तरीही तज्ज्ञ असा सल्ला देतात, की फोन कायमच पाण्यापासून दूर ठेवला पाहिजे. कारण या सगळ्या चाचण्या प्रयोगशाळेत होत असतात. प्रत्यक्षातली स्थिती त्यापेक्षा वेगळी असू शकते. शिवाय, वारंवार पाण्याची संपर्क आल्यानंतर किंवा क्लोरीनयुक्त पाण्याशी वा समुद्राच्या खारट पाण्याशी संपर्क आल्यानंतर फोन खराब होऊ शकतो. ATM रेटिंग्ज ATM रेटिंग्ज साधारणतः स्मार्टवॉचला दिली जातात. ही रेटिंगची यंत्रणा IP रेटिंगपेक्षा जुनी आहे. ATM (Atmospheres) रेटिंग सिस्टीम तुमच्या उपकरणाची पाण्याखालच्या स्थिर वायुमंडलाचा दाब सहन करण्याची क्षमता दर्शवते. ATM रेटिंग 1 असेल, तर याचा अर्थ असा, की तुमच्या स्मार्टवॉचला पाण्यापासून दूरच ठेवा. ATM रेटिंग 3 असेल, तर याचा अर्थ असा, की तुमचं स्मार्टवॉच पावसातही सुरक्षित राहील. ही रेटिंग्ज 5 ATM, 10 ATM किंवा जास्तीत जास्त 20 ATMपर्यंत असू शकतात. 20 ATM असलेलं उपकरण घालून तुम्ही वॉटर स्पोर्टस् अर्थात वॉटर सर्फिंग किंवा जेट सर्फिंग करू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: mobile , money
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात