मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

1 तास आधीच देणार तुम्ही तणावातून जाणार असल्याची माहिती, जाणून घ्या या जबरदस्त Watch बद्दल

1 तास आधीच देणार तुम्ही तणावातून जाणार असल्याची माहिती, जाणून घ्या या जबरदस्त Watch बद्दल

आता वैज्ञानिकांनी अशा एका घड्याळाचा शोध लावला आहे, जे तुमचा मानसिक ताण वाढत असल्याची सूचना (Watch that detect Stress) सुमारे एक तास आधीच तुम्हाला देऊ शकेल. नोवॉच (NOWATCH) असं या घड्याळाचं नाव आहे.

आता वैज्ञानिकांनी अशा एका घड्याळाचा शोध लावला आहे, जे तुमचा मानसिक ताण वाढत असल्याची सूचना (Watch that detect Stress) सुमारे एक तास आधीच तुम्हाला देऊ शकेल. नोवॉच (NOWATCH) असं या घड्याळाचं नाव आहे.

आता वैज्ञानिकांनी अशा एका घड्याळाचा शोध लावला आहे, जे तुमचा मानसिक ताण वाढत असल्याची सूचना (Watch that detect Stress) सुमारे एक तास आधीच तुम्हाला देऊ शकेल. नोवॉच (NOWATCH) असं या घड्याळाचं नाव आहे.

नवी दिल्ली, 5 जानेवारी : सध्या धकाधकीच्या जीवनात कित्येकांना मानसिक आणि शारीरिक ताण-तणावाला सामोरं जावं लागतं. कामाचं प्रेशर, घरचा ताण, अभ्यासाचं टेन्शन अशा बऱ्याच गोष्टींमुळे आपल्याला ताण (Stress) येत असतो. बऱ्याच लोकांना हळूहळू आपला ताण वाढत असल्याचेही समजत नाही. अचानक पॅनिक अटॅक आल्यानंतर किंवा अगदी जास्त ताण वाढल्यानंतरच अनेकांचे त्याकडे लक्ष जाते. मात्र, आता वैज्ञानिकांनी अशा एका घड्याळाचा शोध लावला आहे, जे तुमचा मानसिक ताण वाढत असल्याची सूचना (Watch that detect Stress) सुमारे एक तास आधीच तुम्हाला देऊ शकेल. नोवॉच (NOWATCH) असं या घड्याळाचं नाव आहे.

कसं काम करतं NOWATCH?

आपला ताण जेव्हा वाढत असतो, तेव्हा शरीरातील कॉर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनचे (Stress hormone) प्रमाण वाढते. तुमच्या मनगटावर असलेले नोवॉच, तुमच्या घामाच्या माध्यमातून (Nowatch detects stress hormone in sweat) हे हार्मोन ट्रॅक करतं. जेव्हा घामामध्ये या हार्मोनचं प्रमाण वाढू लागतं, तेव्हा नोवॉच व्हायब्रेट होतं त्यातून आपण समजून जायचं की मानसिक ताण प्रचंड वाढला आहे. नोवॉचमध्ये बसवण्यात आलेल्या डेटा अल्गोरिदम सेन्सरमुळे हे शक्य होते.

विशेष म्हणजे या घड्याळाचा डिस्प्ले अगदी प्लेन (Nowatch has plain display) ठेवण्यात आला आहे. या घड्याळावर कसलेही काटे किंवा अंक दिसत नाहीत. तसेच, स्ट्रेस हार्मोन वाढल्यानंतरही, तो किती प्रमाणात वाढला आहे हे यावर दिसत नाही. तज्ज्ञांनी सांगितले, की जर वाढलेला ताण संख्येमध्ये घड्याळावर दिसला, तर ते पाहून आणखी ताण वाढू (Watching stress in numbers increases stress) शकतो. यामुळे या घड्याळात असे नंबर्स देण्यात आले नाहीत.

Car Driving शिकायचं आहे?Maruti Suzukiने सुरू केले हे खास कोर्स, पाहा किती आहे फी

ताण कमी करण्याच्या टिप्सही देईल घड्याळ -

नोवॉचची खासियत म्हणजे, हे घड्याळ केवळ तुम्हाला ताण वाढला आहे असं सांगत नाही. तर घड्याळ घातलेल्या व्यक्तीला ऑडिओच्या माध्यमातून अशा परिस्थितीमध्ये काय करायचं याचे सल्लेही नोवॉच (Nowatch gives tips to reduce stress) देते. यामध्ये दीर्घ श्वास घेणे, किंवा काही अंतर चालणे अशा सल्ल्यांचा समावेश आहे. या गोष्टींमुळे बऱ्याच प्रमाणात ताण कमी करता येतो.

बॉडी टेंपरेचर चेक करणार हे जबरदस्त Smartwatch,मिळतील 60 वर्कआऊट मोड; किमतही कमी

काय असेल किंमत?

डेलीमेलने दिलेल्या माहितीनुसार, या घड्याळाला अमेरिकेतील लास व्हेगास येथे होणाऱ्या सीईएस कॉन्फरन्समध्ये (Nowatch at CES conference) सादर केलं जाईल. तसेच, या घड्याळाची किंमत (NOWATCH price) सुमारे 57 हजार रुपये असणार आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत हे घड्याळ विक्रीसाठी उपलब्ध होईल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

एकूणच, वारंवार मानसिक ताण-तणावाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी हे घड्याळ अगदी फायद्याचे ठरणार आहे. यामुळे अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच ताण आटोक्यात आणून, पुढे नैराश्याचा धोका टाळण्यास मदत होईल.

First published:

Tags: Smartwatch, Tech news