जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / बॉडी टेंपरेचरही चेक करणार हे जबरदस्त Smartwatch, मिळतील 60 वर्कआऊट मोड; किमतही बजेटमध्ये

बॉडी टेंपरेचरही चेक करणार हे जबरदस्त Smartwatch, मिळतील 60 वर्कआऊट मोड; किमतही बजेटमध्ये

बॉडी टेंपरेचरही चेक करणार हे जबरदस्त Smartwatch, मिळतील 60 वर्कआऊट मोड; किमतही बजेटमध्ये

कंपनीनं भारतात कलरफिट स्मार्टवॉच सीरिजमध्ये कॅलिबर स्मार्टवॉच लाँच केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 6 जानेवारी 2022 पासून ग्राहकांना हे वॉच खरेदी करता येणार आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 4 जानेवारी : सध्या स्मार्टवॉचची मोठी क्रेझ आहे. आता फक्त वेळ पाहण्यापुरताच मनगटावरच्या घड्याळाचा उपयोग राहिलेला नाही. तर अगदी आपल्या फिटनेसकडे लक्ष देणे, फोन, मेसेजेस अशी अनेक कामे एकाच स्मार्टवॉचमध्ये होऊ शकतात. अनेक कंपन्यांची वेगवेगळी फीचर्स असलेली स्मार्टवॉच मार्केटमध्ये आहेत. नॉईज (Noise) कंपनीच्या स्मार्टवॉचला अनेकांची पहिली पसंती असते. आता नॉईजने आपली भारतातील कलरफिट स्मार्टवॉच सीरिज (Smartwatch Series) अपडेट केली आहे. कंपनीनं भारतात कलरफिट स्मार्टवॉच सीरिजमध्ये कॅलिबर स्मार्टवॉच लाँच केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 6 जानेवारी 2022 पासून ग्राहकांना हे वॉच खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टवरुनही हे नवं स्मार्टवॉच खरेदी केलं जाऊ शकतं. हे स्मार्टवॉच कंपनीनं पाच रंगांच्या पर्यायांमध्ये म्हणजेच कलर चॉईसमध्ये लाँच केलं आहे. या स्मारटवॉचचं डिझाईनही आकर्षक आहे आणि याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या हेल्थ आणि अन्य ॲक्टिव्हिटीजही ट्रॅक करु शकाल. स्मार्टवॉचचं डिझाईन चौकोनी आकाराचं आहे आणि त्याचा 1.69 इंची व्ह्युईंग एरिया आहे. त्याची स्क्रीन टीएफटी आहे आणि त्यात 240X 280 पिक्सल क्षमता आहे. हे स्मार्टवॉच 1.5 मीटरपर्यंतच्या पाण्यात वॉटर रेझिस्टंट आहे. या स्मार्टवॉचचं डायल एलिमेंट पॉली कार्बोनेट आहे आणि त्याचे काटेही सिलिकॉनचे आहेत. स्मार्टवॉच फीचर्स - हे स्मार्टवॉच अँड्रॉईडच्या बरोबरच iPhone मॉडेललाही सपोर्ट करतं. नॉईज फिट ॲपमार्फत तुम्ही याचं सेटिंगही बदलू शकता. तसंच या स्मार्टवॉचच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देऊ शकता. यामध्ये तीन ॲक्सिस एक्सेलेरोमीटरच्या बरोबरच SpO2 आणि 24×7 हार्ट रेट म्हणजेच हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवणारे सेन्सर्स देण्यात आले आहेत. त्याशिवाय या स्मार्टवॉचच्या माध्यमातून तुम्ही 60 वर्कआऊट मोजू शकता. त्याशिवाय बॉडी टेंपरेचर म्हणजेच शरीराचं तापमान मोजणारं सेन्सरही या स्मार्टवॉचमध्ये आहे.

    सावधान! महिलांना त्रास देणाऱ्यावर आता ड्रोनचा वॉच; अवघ्या 4 मिनिटांतच मिळणार मदत

    कंपनीनं या स्मार्टवॉचमध्ये 150 पेक्षा जास्त वॉच फेस दिले आहेत. त्याशिवाय पांढरा, लाल, हिरवा, काळा आणि ग्रे असे कलर ऑप्शन्सही देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचला डस्ट आणि वॉटर रेझिस्टंटचं IP68 रेटिंग आहे. या स्मार्टवॉचची किंमत 3,999 रुपये इतकी आहे. त्यामुळे फिटनेस आणि स्टाईल असं एकत्र हवं असेल तर नॉईजच्या या नव्या स्मार्ट वॉचचा पर्याय बेस्ट आहे. तुम्हीही जर घड्याळ विकत घेण्याच्या तयारीत असाल तर नॉइजच्या स्मार्टवॉच पर्यायाचा विचार करू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात