मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

6000 mAh बॅटरी असणाऱ्या फोनवर मिळवा भरघोस सूट; पाहा काय आहे सॅमसंगची भन्नाट ऑफर

6000 mAh बॅटरी असणाऱ्या फोनवर मिळवा भरघोस सूट; पाहा काय आहे सॅमसंगची भन्नाट ऑफर

तुम्ही एखादा पॉवरफुल फोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, सॅमसंग ही कंपनी आपल्या गॅलेक्सी F22 या फोनवर (Samsung Galaxy F22 offer) मोठी सूट देत आहे.

तुम्ही एखादा पॉवरफुल फोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, सॅमसंग ही कंपनी आपल्या गॅलेक्सी F22 या फोनवर (Samsung Galaxy F22 offer) मोठी सूट देत आहे.

तुम्ही एखादा पॉवरफुल फोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, सॅमसंग ही कंपनी आपल्या गॅलेक्सी F22 या फोनवर (Samsung Galaxy F22 offer) मोठी सूट देत आहे.

नवी दिल्ली 31 जुलै : नवा स्मार्टफोन घेताना आपण ज्या गोष्टींचा विचार करतो, त्यात कॅमेरा, स्टोरेज आणि बॅटरीचा समावेश असतो. स्मार्टफोन्समधील फीचर्स कितीही अॅडव्हान्स्ड असली, तरी त्याची बॅटरी जास्त टिकत नसेल, तर या फीचर्सचा फायदाच घेता येत नाही. यामुळे 5000 mAh पेक्षा अधिक क्षमतेची बॅटरी असणाऱ्या स्मार्टफोन्सना प्राधान्य दिलं जातं. काही कंपन्या तर आता चक्क सहा ते सात हजार एमएएच क्षमतेची बॅटरी असणारे स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. तुम्हीही असाच एखादा पॉवरफुल फोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, सॅमसंग ही कंपनी आपल्या गॅलेक्सी F22 या फोनवर (Samsung Galaxy F22 offer) मोठी सूट देत आहे.

सॅमसंग डॉट कॉम या वेबसाइटवरून (Samsung.com) मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आला होता. गॅलेक्सी F22 फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल मेमरी असणाऱ्या व्हॅरिएंटची सुरुवातीची किंमत 12,499 रुपये ठेवण्यात आली होती; मात्र कंपनीने दिलेल्या या ऑफरमध्ये (Samsung 6000 mAh phone offer) हा फोन आणखी एक हजार रुपये कमी किंमतीला विकत घेता येऊ शकतो.

तुम्ही केलेलं Search खरं की खोटं? आता Google चं देणार इशारा

यासाठी तुम्हाला आयसीआयसीआय (Samsung ICICI offer) बँकेच्या कार्डची गरज असणार आहे. ICICI बँकेचं कार्ड वापरून या फोनची खरेदी केल्यास, एक हजार रुपये इन्स्टंट कॅशबॅक मिळणार आहे. त्यामुळे या फोनची किंमत 11,499 रुपये एवढी होईल.

गॅलेक्सी F22ची फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी F22 (Galaxy F22 Features) या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंच एचडी प्लस (HD+) इन्फिनिटी-यू सुपर अॅमोलेड (AMOLED) डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचं रिझॉल्यूशन 1600x720 पिक्सेल आहे. याचा अॅस्पेक्ट रेशिओ 20:9 आहे, तर रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आहे. प्रोसेसरबाबत सांगायचं झाल्यास, या फोनमध्ये ऑक्टा-कोअर मीडियाटेक हीलिओ G80 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 12 एनएम प्रोसेसरवर आधारित आहे. या फोनमध्ये तुम्हाला अँड्रॉइड 11 बेस्ड वनयूआय कोर 3.1 मिळते.

गॅलेक्सी F22 चे 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम असे दोन व्हॅरिएंट आहेत. 4 जीबी रॅमसोबत तुम्हाला 64 जीबी इंटर्नल मेमरी मिळते. 6 जीबी रॅमसोबत तुम्हाला 128 जीबी इंटर्नल मेमरी मिळते. इंटर्नल मेमरी तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढवूही शकता.

कोरोना लशीचा डोस घेतल्यावर मेसेज आला नाही तर Vaccine Certificate कसं मिळवायचं?

या फोनमध्ये मागच्या बाजूला चार कॅमेरे आहेत. यातील मुख्य कॅमेरा हा 48 मेगापिक्सेल क्षमतेचा आहे. यासोबतच, आठ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड, दोन मेगापिक्सेल डेप्थ आणि दोन मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर असे कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनचा यूएसपी म्हणजे, त्याची 6000 mAh (Smartphone with 6000 mAh battery) क्षमतेची बॅटरी. यासोबत 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन ड्युअल फोरजी व्हीओएलटीई (Dual 4G VolTE) सिम सपोर्ट करतो. यासोबतच वायफाय 802.11. ब्लूटूथ 5, जीपीएस/ग्लोनास/बायडू, यूएसबी टाइप-सी अशी फीचर्स या फोनमध्ये देण्यात आली आहेत.

First published:

Tags: Mobile Phone, Samsung, Technology