या नव्या फीचरमध्ये सर्च केलेली कोणतीही माहिती जर विश्वसनीय नसेल, तर गुगलकडून याबाबत वॉर्निंग येईल. या वॉर्निंगमध्ये युजरने सर्च केलेला कंटेंट सतत अपडेट होत आहे, असं सांगितलं जाईल.
जेव्हा एखादी बातमी किंवा माहिती अतिशय वेगाने विकसित होत असेल आणि कोणत्याही स्त्रोताकडून ती माहिती कन्फर्म झाली नसेल, त्याचवेळी Google त्या सर्चबाबत अशाप्रकारे कंटेंट अपडेट होत असल्याचा इशारा देईल.
ज्यावेळी सर्च इंजिनला त्या माहितीबाबत अधिक परिणाम मिळतील, त्यानंतर युजर्स नंतर ही माहिती पुन्हा पाहू शकतात.
या टूलद्वारे फेक न्यूज कमी होण्यास मदत होईल. यामुळे चुकीची माहिती पसरण्यापासून आळा घालण्यास मदत होईल.