मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Vaccine Certificate: कोरोना लशीचा डोस घेतल्यावर मेसेज आला नाही तरी प्रमाणपत्र करता येईल डाउनलोड

Vaccine Certificate: कोरोना लशीचा डोस घेतल्यावर मेसेज आला नाही तरी प्रमाणपत्र करता येईल डाउनलोड

कोणत्याही लसीचा डोस घेतल्यानंतर, तुम्ही डोस घेतला असा मेसेज तुमच्या मोबाईलवर येतो. असा मेसेज नाही आला तर काय करायचं? Vaccination Certificate कसं मिळवायचं?

कोणत्याही लसीचा डोस घेतल्यानंतर, तुम्ही डोस घेतला असा मेसेज तुमच्या मोबाईलवर येतो. असा मेसेज नाही आला तर काय करायचं? Vaccination Certificate कसं मिळवायचं?

कोणत्याही लसीचा डोस घेतल्यानंतर, तुम्ही डोस घेतला असा मेसेज तुमच्या मोबाईलवर येतो. असा मेसेज नाही आला तर काय करायचं? Vaccination Certificate कसं मिळवायचं?

    नवी दिल्ली, 29 जुलै : सध्या देशात कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second Wave) ओसरताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तुलनेने रुग्णसंख्या कमी होत आहे. परंतु, त्याचबरोबर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण (Vaccination) मोहीम वेगात सुरु आहे. लसीचा तुटवडा, तांत्रिक अडचणी आदी समस्या या मोहिमेत आहेत. तरी देखील लाखो लोकांचे लसीकरण दररोज सुरु आहे. लसीकरण मोहिम यंत्रणा संपूर्णतः डिजीटली कार्यरत आहे. कोणत्याही लसीचा डोस घेतल्यानंतर, तुम्ही डोस घेतला असा मेसेज तुमच्या मोबाईलवर येतो. या मेसेजच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला आगामी काळात एक महत्वाचा दस्तावेज ठरणारे लसीकरणाचे प्रमाणपत्र (Vaccination Certificate) डाउनलोड करता येते. परंतु, काही वेळा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या व्यस्ततेमुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे डोस घेतल्याचा मेसेज येत नाही. त्यामुळे तुम्हाला लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करणे अशक्य होते. असे झाल्यास काय करावे जाणून घेऊया त्याविषयी...

    लस घेतल्यानंतर मेसेज न आल्याने लसीकरण प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येतात. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय करावं, याबाबतचे वृत्त टीव्ही नाइन हिंदीने दिलं आहे. लस घेतल्यानंतर जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही कोविनच्या (CoWIN) माध्यमातून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने प्रमाणपत्र डाउनलोड करण्याचा प्रयत्न करावा. लसीकरणचा डेटा अपडेट झाल्यावरच तुम्ही येथून प्रमाणपत्र डाउनलोड करु शकता.

    कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे दर वाढले, जाणून घ्या नवे दर

    जर तुमचा लसीकरणाचा डेटा (Vaccination Data) अपडेट झाला नसेल तर मग तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा अडचणी जाणवल्यास संबंधित व्यक्तीने तातडीने ज्या केंद्रावर लसीचा डोस घेतला आहे, त्या केंद्राशी संपर्क करुन याबाबत नावनोंदणी करावी. लस घेऊन जास्त दिवस झाले असतील तर तुम्ही नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करु शकता. मात्र हे काम तत्काळ न केल्यास लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी पुन्हा अडचण येऊ शकते. परंतु, मेसेज न आल्यास तुम्हाला पुन्हा नोंदणी करावी लागेल. त्यानंतर सिस्टीममध्ये ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांदा नोंदणी केली आहे त्याचा तपशील येईल आणि त्यानुसारच तुम्हाला लसीच्या दुसऱ्या डोससाठी तारीख मिळेल, असे वरिष्ठ डॉक्टर संयम अग्रवाल यांनी सांगितले.

    घरच्या घरी अशी करा कोरोना टेस्ट; 15 मिनिटांत कळेल रिझल्ट! 3 किट्सना मान्यता

    कोरोनाचा संसर्गबघता केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने मार्गदर्शक सूचना जारी करत असते. अनेक राज्यांमधील अशा लोकांना सूट दिली जात आहे की ज्यांचे लसीकरण झाले आहे. जर तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विमानप्रवास करत असाल तर तुमच्याकडे लसीकरण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तसेच चित्रपटगृहासारख्या ठिकाणी देखील आता लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. जर तुम्ही लसीचा पहिला डोस घेतला आहे आणि दुसरा डोस घेण्यासाठी जाणार असाल तर तुमच्या आधारकार्डवर (Aadhar Card) पहिला डोस घेतल्याची नोंद आवश्यक आहे. त्यामुळे लसीचा पहिला डोस घेतल्याचा मेसेज तुम्हाला आला नसेल तर तुम्ही याबाबत तातडीनं अपडेट करणं गरजेचं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Corona vaccine, Coronavirus