नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : फेसबुक (Facebook) पुढच्या वर्षापर्यंत स्मार्ट वॉच (Smart Watch) लाँच करू शकतं. मिळालेल्या रिपोर्टनुसार, सोशल मीडिया कंपनी आपलं स्मार्टवॉच पुढील वर्षी बाजारात आणू शकते. या स्मार्टवॉचमध्ये 4G, 5G कनेक्टिविटी आणि इतर अनेक हेल्थ सेंसर दिले जाण्याची शक्यता आहे. तसंच कंपनी स्वत:च्या ऑपरेटिंग सिस्टमवरही काम करत आहे. The Information आणि XDA Developer ने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक वियरेबल डिव्हाईसेजवर फोकस करत आहे. सोशल मीडिया कंपनीचं असं म्हणणं आहे की, स्मार्टफोन व्यतिरिक्त युजर्समध्ये वियरेबल्सची मोठी डिमांड आहे. त्यामुळे Facebook स्मार्टवॉच बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. हे असू शकतात फीचर्स - XDA Developer नुसार, Facebook च्या स्मार्टवॉचमध्ये प्रमुख मेसेजिंग फीचरवर काम करण्यात येणार आहे. कंपनी आपले तीनही इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp, Messenger आणि Instagram ला आपल्या स्मार्टवॉचमध्ये इंटिग्रेट करू शकते. यात सेल्युलर कनेक्टिविटीही (4G/5G) मिळू शकते. सेल्युलर कनेक्टिविटी असल्याने स्मार्टवॉचच्या युजर्सला स्मार्टफोनवर निर्भर राहावं लागणार नाही. यामुळे युजर आपल्या मित्र-नातेवाईकांशी विना मोबाईलही कम्युनिकेट करू शकतो. The Information च्या रिपोर्टनुसार, फेसबुकचं स्मार्टवॉच सध्या लाँच होणाऱ्या अधिकतर वियरेबल्स आणि फिटनेस ट्रॅकरप्रमाणे हेल्थ सर्विसेजसह येऊ शकतं. यात हार्ट रेट मॉनिटरिंग फीचर आणि ब्लड ऑक्सिजन लेवल ट्रॅकर इत्यादींचा समावेश असेल. Facebook चं अपकमिंग स्मार्टवॉच ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम Google Android वर काही दिवस काम करेल. त्यानंतर कंपनी स्वत:च्या ऑपरेटिंग सिस्टम Facebook OS वर काम करेल. Facebook चं ऑपरेटिंग सिस्टम 2023 पर्यंत लाँच होऊ शकतं, जे Facebook Smart Watch च्या सेकेंड जनरेशनला सपोर्ट करेल. या स्मार्टवॉचसाठी पुढच्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.