सिंगापूर, 30 सप्टेंबर : सामान्यपणे आपण घड्याळ (Watch) वेळ पाहण्यासाठी वापरतो दाखवतं. पण आता घड्याळसुद्धा स्मार्ट (Smartwatch) झाली आहे. वेळ दाखवण्याशिवाय घड्याळ बरीच कामं करतं. विशेषतः आरोग्यावरही लक्ष ठेवतं. स्मार्टवॉचमध्ये आरोग्यासंबंधी बरेच फिचर आहेत. ज्यात तुम्ही रोज पायी किती चाललात, किती कॅलरी खर्च झाल्या, हृदयाचे ठोके, रक्तदाब किती आहे याची माहिती यात मिळते. ज्याची मदत तुम्हाला हेल्दी आणि फिट राहण्यात होते. पण आता घड्याळ यापेक्षाही स्मार्ट झाला आहे. अॅपलच्या स्मार्टवॉचने चक्क एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. (Smartwatch saved mans life). एक घड्याळ (Apple Smartwatch saved mans life) जे निर्जीव आहे, ते कसं काय बरं जीव वाचवू शकतं, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? (Apple Smartwatch)
वेळ दाखवणाऱ्या घड्याळामुळे सिंगापूरमध्ये एका तरुणाची वाईट वेळ टळली. त्याच्या हातातील घड्याळाने त्याला अपघातातून वाचवलं आहे. 24 वर्षांचा मोहम्मद फित्री बाईकवरून प्रवास करत होता, तेव्हा त्याला बाईकला अपघात झाला. एका गाडीने त्याच्या बाईकला टक्कर दिली आणि मोहम्मद गाडीवरून रस्तावर पडला. त्यानंतर तो बेशुद्धच झाला. पण त्याच्या हातातील अॅपलचं स्मार्टवॉच त्यासाठी अगदी देवदूतासारखं धावून आलं.
हे वाचा - जीवघेण्या कोरोनामुळेच जीवदान; कोविडने महिलेला मरणातून वाचवलं
अॅपल वॉचने त्याच्या हालचालीला ट्रॅक केलं होतं. जेव्हा मोहम्मद बाईकवरून पडला आणि त्यानंतर खूप वेळ त्याच्या शरीराची हालचाल झाली नाही, हे सर्व अॅपल वॉचला समजलं. त्यानंतर आपल्या ऑटोमॅटिक प्रोग्रामिंकमार्फत घड्याळाने सर्वात आधी आपात्कालीन सेवेला फोन केला. त्यानंतर मोहम्मदच्या प्रायमरी कॉन्टॅक्ट्समध्ये असलेल्या नंबर्सवरही कॉल केला.
सिंगापूर सिव्हिल डिफेन्स फोर्सने दिलेल्या माहितीनुसार रात्री 8 वाजून 20 मिनिटांला हा अपघात झाला. याची माहिती होताच मोहम्मदला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
द सनच्या रिपोर्टनुसार, तरुणाच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा मोहम्मदचा अपघात झाला तेव्हा तिथं दुसरं कुणीच नव्हतं. घड्याळाने आम्हाला याची माहिती दिली हे आम्हाला नंतर समजलं. जर वेळीच घड्याळाने अपघाताची बातमी दिली नसती तर कदाचित मोहम्मदची प्रकृती अधिक गंभीर झाली असते.
हे वाचा - Smart Toilet: आता हे कमोड घेणार आरोग्याची काळजी; सांगणार आपले आजार
Apple Smartwatch च्या चौथ्या सीरिजमध्ये हे अनोखं आणि अतिशय उपयुक्त असं फिचर देण्यात आलं आहे. ज्यामध्ये शरीराच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासह अचानक अपघात झाल्यानंतरही हे घड्याळ अलार्म देतं. मिनिटापर्यंत शरीराची हालचाल जाणवली नाही तर घड्याळ आपत्कालीन सेवा आणि प्रायमरी कॉन्टॅक्ट लिस्टमधील नंबर्सवर कॉल करतं. अॅपलशिवाय आता Samsung Galaxy Watch 3 मध्येसुद्धा एमर्जन्सी कॉलिंग फिचर देण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Apple, Lifestyle, Smartwatch, Technology