लंडन, 29 सप्टेंबर : जगभरात कित्येकांचा जीव घेणाऱ्या कोरोनाव्हायरसने (Coronavirus) एका महिलेचा मात्र जीव वाचवला आहे. कोरोनामुळेच आपला जीव वाचला आहे (Corona saved woman life), असा दावा या महिलेने केला आहे. कोव्हिड हा भयंकर आजार असला तरी याच आजारामुळे तिला असलेल्या आणखी दोन महाभयंकर आजारांचं निदान झालं. जे कोरोनासारखेच जीवघेणे आहेत.
यूकेमध्ये (UK) राहणारी 41 वर्षांची जेम्मा फॅलूनला (Jemma Falloon) घशात खवखव जाणवत होती. पण त्याकडे ती दुर्लक्ष करत होती. तिला कोरोना झाला होता. त्यामुळे लाँग कोव्हिडची लक्षणं असावीत असं तिला वाटलं. पण नंतर तिची समस्या अधिकच वाढली. तिला पाठीत तीव्र वेदना होऊ लागल्या. लघवीतून रक्त येऊ लागलं. तेव्हा मात्र ती घाबरली. तिने तात्काळ डॉक्टरांकडे धाव घेतली. तिच्या काही तपासण्या करण्यात आल्या.
View this post on Instagram
वैद्यकीय रिपोर्ट पाहून तिला धक्काच बसला. तिला थायरॉईड आणि किडनीचा कॅन्सर असल्याचं निदान झालं.
हे वाचा - अरे बापरे! लसीकरणानंतर तरुणीचं तोंड झालं वाकडं; कोरोना लशीचा दुष्परिणाम झाल्याचा दावा
डॉक्टरांच्या मते, जर आणखी काही दिवस तिच्या आजाराचं निदान झालं नसतं तर तिचा जीव गेला असता. ती कॅन्सर शेवटच्या टप्प्यात असताना रुग्णालयात गेली. जेम्माची तीन वेळा सर्जरी करण्यात आली. तिचा कॅन्सर ट्युमर काढण्यात आला आहे.
जेम्मा सांगते, कोरोनाने माझा जीव वाचवला. मी काम करत राहिली असतील, सुट्टी घेतली नसती आणि कोरोनाच्या भीतीने टेस्ट केली नसती तर या जीवघेण्या आजाराबाबत समजलंच नसतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Lifestyle