नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : Xiaomiने आपली लेटेस्ट आणि अॅडव्हान्स वायरलेस फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी लॉन्च केली आहे. 80 वॅट (80W) रेटिंगमुळे याला जगातील सर्वात फास्ट वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी असल्याचं बोललं जात आहे. या टेक्नोलॉजीच्या मदतीने 4000mAh बॅटरीवाला स्मार्टफोन केवळ 19 मिनिटांत चार्ज केला जाऊ शकतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
यापूर्वी शाओमीने सर्वात जलद वायरलेस चार्जिंग 50W टेक्नोलॉजी लॉन्च केली होती. ही टेक्नोलॉजी कंपनीने, याच वर्षी ऑगस्ट महिन्यात लॉन्च झालेल्या Mi 10 Ultra स्मार्टफोनमध्ये ऑफर केली आहे. तर मार्च 2020 मध्ये कंपनीने आपल्या 40 W फास्ट वायरलेस चार्जिंगची ही घोषणा केली होती.
80W! This is the 3rd breakthrough made by the Xiaomi wireless charging team this year, and we're setting another industry-leading standard again!
With this, we believe that the era where wireless replaces traditional wired charging is coming soon!
वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजीमध्ये शाओमीने मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीने सर्वात आधी Mi MIX 2S स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी लॉन्च केली होती. हा फोन 7.5 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. त्यानंतर कंपनीने Mi MIX3 बाजारात आणला होता, त्याला 10 वॅट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला होता. गेल्या वर्षी कंपनीने Mi 9 स्मार्टफोन लॉन्च केला होता, ज्यात 20 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला होता.
शाओमी सध्या 100W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीवर काम करत असल्याची माहिती आहे. ही टेक्नोलॉजी पुढील वर्षात लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनी ही टेक्नोलॉजी आपल्या अपकमिंग फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ऑफर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.