नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : भारतातील स्मार्टफोन निर्माता कंपनी Micromax लवकरच देशात आपला नवा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नवी स्मार्टफोन सीरीज लॉन्च करण्याचं कंपनीचं प्लानिंग आहे. भारतीय मोबाईल कंपनी मायक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
कंपनीने आगामी सीरीजबद्दल कोणतीही संपूर्ण माहिती दिलेली नाही. राहुल शर्मा यांनी 2 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला असून, त्यात ते कंपनीच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलत आहेत. व्हिडिओमध्ये त्यांनी त्यावेळची परिस्थिती सांगितली, ज्यावेळी चीनी स्मार्टफोन कंपन्यांनी बाजारात कब्जा केला होता. त्यामुळे Micromax कंपनीच्या स्मार्टफोन विक्रीत मोठी घसरण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
वाचा - घरबसल्या पाहता येणार दुर्गा पूजा; Xiaomiची नवी मोहिम
ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारतची घोषणा केली, त्यावेळी पुन्हा यावर काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचं राहुल शर्मा यांनी सांगितलं. त्यामुळे आता मायक्रोमॅक्स पुन्हा एकदा 'In' इंडियासह बाजारात उतरणार आहे. व्हिडिओत एका ब्लू रंगाच्या बॉक्सवर In लिहिलेलं आहे. कंपनीने एका नव्या In-सीरीज अंतर्गत स्मार्टफोन लॉन्च करण्याचे संकेत दिले आहेत.
We're #INForIndia with #INMobiles! What about you? #IndiaKeLiye #BigAnnouncement #MicromaxIsBack #AatmanirbharBharat pic.twitter.com/eridOF5MdQ
— Micromax India (@Micromax__India) October 16, 2020
माइक्रोमॅक्स In-सीरीज स्मार्टफोन किंमत -
कंपनीच्या आगामी सीरीजबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र टिप्स्टर सुमुख राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोमॅक्सचे In-सीरीज स्मार्टफोन 7000 ते 15000 रुपयांपर्यंत लॉन्च केले जातील. हे स्मार्टफोन स्टॉक अँड्रॉईडसह नोव्हेंबरच्या सुरुवातीला देशात लॉन्च केले जातील.