जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / घरबसल्या पाहता येणार दुर्गा पूजा; Xiaomiची नवी मोहिम

घरबसल्या पाहता येणार दुर्गा पूजा; Xiaomiची नवी मोहिम

घरबसल्या पाहता येणार दुर्गा पूजा; Xiaomiची नवी मोहिम

स्मार्टफोन कंपनी शाओमीने Xiaomi नवी मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत भक्तांना आपल्या घर बसल्या दुर्गा पूजेचा आनंद घेता येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : देशभरात असलेल्या कोरोना व्हायरसमुळे (coronavirus) यंदा नवरात्रोत्सव अतिशय साधेपणाने साजरा होत आहे. लोक नवरात्रीच्या दुर्गा पूजेसाठी (Durga Puja) सामिल होऊ शकत नाही. भक्तांची हीच समस्या दूर करण्यासाठी स्मार्टफोन कंपनी शाओमीने Xiaomi नवी मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत भक्तांना आपल्या घर बसल्या दुर्गा पूजेचा आनंद घेता येणार आहे. कंपनीच्या या मोहिमेमुळे कोरोना काळात महत्त्वाचं असणाऱ्या सोशल डिस्टन्सिंगच (Social Distancing) पालनही होईल आणि लोक दुर्गापूजेचा आनंदी घेऊ शकतील. लाईव्ह आरती - मोबाईल आणि टीव्ही निर्माता कंपनी MI ने लोकांना दुर्गा पूजेचा आनंद घेता यावा, तसंच गर्दीपासून वाचवण्यासाठी नवी सुरुवात केली आहे. याअंतर्गत लोक घर बसल्या लाईव्ह दुर्गा पूजेचा आनंद घेऊ शकतील. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.

हे वाचा -  सहा महिन्यांनंतर सुरू होत आहेत सिनेमागृहं, Paytm कडून मिळतील या खास सुविधा

या पोर्टलवरून पाहा लाईव्ह आरती - Mi इंडियाचे संचालक सुनील बेबी यांनी, कंपनीने ऑनलाईन पोर्टल ‘त्रिनयन’ची सुरुवात केल्याचं सांगितलं. लोक या पोर्टलच्या मदतीने लाईव्ह दुर्गा पूजा पाहू शकणार आहेत. या मोहिमेंतर्गत कोलकातातील 10 प्रसिद्ध आयोजन स्थळांवर 40 कॅमेरे लावण्यात येणार आहेत. ज्याच्या मदतीने लोक मंडपातील पूजा-पाठही पाहू शकतील.

हे वाचा -  आता गुगलवर गाणी शोधा, फक्त चाल गुणगुणत

लाईव्ह आरती पाहण्यासाठी ‘त्रिनयन’पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतरच लाईव्ह आरती, देवीचं दर्शन करता येईल. या पोर्टद्वारे अनेक मोठ-मोठ्या मंदिरांचं दर्शन घेता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Xiaomi
  • First Published :
जाहिरात
जाहिरात