जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / कोरोना काळात सॅमसंगचा हँड वॉश फीचरसह galaxy fit 2 बँड लॉन्च

कोरोना काळात सॅमसंगचा हँड वॉश फीचरसह galaxy fit 2 बँड लॉन्च

कोरोना काळात सॅमसंगचा हँड वॉश फीचरसह galaxy fit 2 बँड लॉन्च

कोरोना काळात सॅमसंगने हा फिटनेस बँड लॉन्च केला. त्यामुळे कंपनीने यात हँड वॉश फीचरही जोडलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : सॅमसंगने आपला लेटेस्ट फिटनेस बँड गॅलेक्सी फिट 2 लॉन्च केला आहे. कंपनीने या महिन्यात झालेल्या एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये हा फिटनेस बँड शोकेस केला होता. सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार, हा बँड एकदा फुल चार्ज केल्यानंतर 21 दिवस बॅटरी लाईफ मिळते. samsung galaxy fit 2 मध्ये AMOLED डिस्प्ले वापरण्यात आला आहे. कोरोना काळात सॅमसंगने हा फिटनेस बँड लॉन्च केला. त्यामुळे कंपनीने यात हँड वॉश फीचरही जोडलं आहे. जो वेळो-वेळी हात धुण्यासाठी वापरात येईल. तसंच यात वॉटर रेसिस्टेंस 5ATM मोड आहे. हा बँड कंपनीने ब्लॅक आणि स्कारलेट या दोन रंगात लॉन्च केला आहे. भारतात सॅमसंग गॅलेक्सी फिट 2ची किंमत 3999 रुपये आहे. हा बँड अमेझॉन, सॅमसंग डॉट कॉम आणि ऑफलाईन रिटेल स्टोरमध्ये खरेदी करता येणार आहे. हे वाचा -  JIO च्या सब्सक्राइबर्समध्ये मोठी वाढ; एयरटेल, वोडाफोन-आयडियाला मोठं नुकसान samsung galaxy fit 2 बँड 1.1 इंची AMOLED डिस्प्लेसह, उत्तम व्हिजिबिलिटीसाठी 450nits ब्राईटनेस देतो. तसंच हेल्थ ऍपमधून पाच ऑटोमेटिक वर्कआउट आणि सॅमसंग हेल्थ ऍपच्या प्रीसेट माध्यमातून जवळपास 90 हून अधिक वर्कआउट ट्रॅक करतो. यात स्लिप एनालिसिसही देण्यात आलं आहे. जो झोपण्याचा पॅटर्न वेक, REM, लाइट आणि डीप या चार प्रकारात ट्रॅक करतो.

हे वाचा -  आता गुगलवर गाणी शोधा, फक्त चाल गुणगुणत

यात स्ट्रेस ट्रॅकिंगचीही सुविधा आहे, जी युजरच्या तणावाच्या स्तरवर लक्ष ठेवते. तसंच हा बँड हाय स्ट्रेस लेवल ट्रॅक झाल्यानंतर एका ब्रीदिंग गाईडचा सल्लाही देतो. फोनच्या म्युझिक प्लेयरवर क्विक एक्सेसही देतो.

हे वाचा -  ऑनलाईन शॉपिंग करताना ‘या’ शब्दांचा अर्थ नीट समजून घ्या, अन्यथा होऊ शकते फसवणूक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: samsung
  • First Published :
जाहिरात
जाहिरात