Anti trust प्रकरण : Google च्या विश्वासार्हतेला तडा? Smart TV मार्केटमध्ये दुरुपयोग केल्याचा आरोप

Anti trust प्रकरण : Google च्या विश्वासार्हतेला तडा? Smart TV मार्केटमध्ये दुरुपयोग केल्याचा आरोप

Google विरोधात देशात एक नवं ऍन्टीट्रस्ट प्रकरणं समोर आलं आहे. Googleने स्मार्ट टेलिव्हिजन मार्केटमध्ये आपल्या ऍन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमचा दुरुपयोग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : Google विरोधात देशात एक नवं प्रकरण समोर आलं आहे, Antitrust किंवा विश्वासार्हतेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप Google वर केला जात आहे.  याप्रकरणी वकील आणि सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, Googleने स्मार्ट टेलिव्हिजन मार्केटमध्ये एकाधिकारशाही राखण्याच्या उद्देशाने आपल्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमचा दुरुपयोग केला, असा आरोप आहे . भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI) या आरोपांची चौकशी करत आहे. अँटी-ट्रस्ट वकील क्षितिज आर्य आणि पुरुषोत्तम आनंद यांनी CCI कडे तक्रार दाखल केली आहे. Google विरोधातील हे प्रकरण देशातील चौथं सर्वात मोठं Anti trust प्रकरण आहे. या दोघांनी Google विरोधात स्मार्ट टेलिव्हिजन मार्केटमध्ये गैरफायदा घेतल्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर एखादा टीव्ही निर्मात्याला Googleच्या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करायचा असल्यास, त्यास काही तडजोड करावी लागते. हे करार इतर कोणत्याही डिव्हाईसच्या उत्पादनास प्रतिबंधित आहेत. Google स्मार्ट टीव्हीमध्ये मक्तेदारी करण्यासाठी ऍन्ड्रॉईडच्या वर्चस्वाचा वापर करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, Googleच्या प्रवक्त्यांनी यासंबंधी बोलण्यास नकार दिला आहे.

हे वाचा - आयातीवर बंदी आणल्यानंतर आता Samsung भारतातच सुरू करणार टीव्हीचं उत्पादन

गुगलवर असा आरोप आहे की, ज्या कंपन्या त्यांच्या अँड्रॉईड सिस्टमवर आधारित स्मार्टफोनची विक्री करत आहेत, त्या गुगलच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित स्मार्ट टीव्हीची विक्री करू शकत नाही. त्याशिवाय जर एखादी कंपनी गुगलच्या प्रतिस्पर्धी अमेझॉनच्या फायर ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित स्मार्ट टीव्हीची विक्री करत असेल, तर ते गुगलच्या प्ले स्टोर अॅप्समध्ये आपल्या ग्राहकांसाठी देणार नाही.

हे वाचा - सावधान! Googleने play storeवरुन हटवले 34 धोकादायक ऍप्स; तुम्हीही करा डिलीट

भारतीय प्रतिस्पर्धात्मक आयोग (CCI) जूनपासूनच गुगलविरोधात प्रतिस्पर्धीरोधी हालचालींबाबत तपास करत आहेत. सीसीआय गुगलवर लावण्यात आलेल्या या आरोपाचा तपास करत आहेत की, स्मार्ट टीव्हीसाठी ऍन्ड्रॉईड सिस्टममध्ये प्रयोग करणाऱ्या, अमेझॉनसारख्या अनेक कंपन्यांच्या व्यावसायिक हितासंबंधांमध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का? याचा तपास सुरु आहे. याबाबत अमेझॉन आणि सीसीआयने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: October 8, 2020, 5:01 PM IST
Tags: Google

ताज्या बातम्या