कोलकाता, 6 ऑक्टोबर : सॅमसंग इंडिया (Samsung India) डिसेंबरपासून भारतात टीव्ही सेट्सचं (Television) उत्पादन सुरु करणार असल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग जोपर्यंत भारतात टीव्ही उत्पादन सुरु करत नाही, तोपर्यंत टीव्ही सेट्स आयात करण्याची परवानगी देण्याची मागणी, सॅमसंगने सरकारकडे केली आहे. सॅमसंग सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांपैकी एक आहे. देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने रंगीत टेलिव्हिजनच्या आयातीवर (Color Television) गुरुवारी निर्बंध (Ban) लावले. सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचा उद्देश, टेलिव्हिजनच्या घरगुती अर्थात देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहन देणं आणि चीनसारख्या देशांकडून आवश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करणं हा आहे. हे वाचा : Apple, Xiaomi सह अनेक मोबाईल फोन महागण्याची शक्यता; हे आहे कारण इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सॅमसंगने 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना याबाबत एक पत्र लिहिलं आहे. या उद्योगाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कंपनीने पंतप्रधान कार्यालय आणि विदेश व्यापार महासंचालनालयालाही पत्र लिहिलं आहे. दरम्यान, सॅमसंगने 2018 मध्ये, सरकारने ओपन सेल टेलिव्हिजन पॅनलवर आयात शुल्क लागू केल्यानंतर चेन्नईमध्ये आपला टेलिव्हिजन प्लांट बंद केला होता.
हे वाचा : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; स्ट्रीट फूडचीही होणार होम डिलिव्हरी
चीनकडून होणाऱ्या आयातीपासून परावृत्त करण्यासाठी आणि स्थानिक उत्पादनाला चालना देण्याच्या धोरणाचा भाग म्हणून, सरकारकडून 30 जुलै रोजी पहिल्यांदा 20 वर्षांसाठी आयातीच्या निर्बंधित यादीमध्ये टेलिव्हिजन सेट्सचा समावेश करण्यात आला होता. कंपन्यांना आता टीव्ही सेट आयात करण्यासाठी लायसन्सची आवश्यकता असते. आतापर्यंत सरकारने असा कोणताही परमिट जारी केलेला नाही.
हे वाचा : 66 दिवस चालते ‘या’ स्वस्त 4 कॅमेरावाल्या स्मार्टफोनची बॅटरी, कंपनीचा दावा
रविशंकर प्रसाद यांना लिहिलेल्या पत्रात सॅमसंगने नमूद केलं आहे की, आयातीवरील निर्बंध इज ऑफ डुईंग बिझनेसच्या नितिविरुद्ध होते. आम्ही डिसेंबर 2020 पर्यंत टीव्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरु करत असून सुलभ व्यवसायाच्या निरंतरतेसाठी विनंती करत आहोत, असं सांगण्यात आलं आहे.