मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

जुना फोन Factory Reset कसा करायचा? या सोप्या टिप्स करा फॉलो

जुना फोन Factory Reset कसा करायचा? या सोप्या टिप्स करा फॉलो

फोन रिसेट करण्यापूर्वी सर्वांत आधी Settings मध्ये जाऊन Accounts या पर्यायावर जावं.

फोन रिसेट करण्यापूर्वी सर्वांत आधी Settings मध्ये जाऊन Accounts या पर्यायावर जावं.

फोन रिसेट करण्यापूर्वी सर्वांत आधी Settings मध्ये जाऊन Accounts या पर्यायावर जावं.

मुंबई 13 जुलैतुम्ही नवा स्मार्टफोन (New Smartphone) घेताय का? बाजारपेठेत सादर झालेल्या नव्या उत्तमोत्तम स्मार्टफोन्समधून तुम्ही निवड करणार असाल. तो फोन Samsung Galaxy S21 किंवा Xiaomi Mi Ultra किंवा कदाचित OnePlus 9 यांपैकी किंवा अन्य कोणताही असू शकतो. नवा फोन वापरण्याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेलच; पण नवा फोन घेताना सर्वांत महत्त्वाचं काम असतं ते जुन्या अँड्रॉइड फोनमधला तुमचा डेटा योग्य पद्धतीने त्या फोनमधून काढून टाकण्याचं. तुमचा आधीचा स्मार्टफोन तुम्ही कोणाला विकणार असाल किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणाकडे असाच वापरायला देणार असाल, तरीही त्या फोनमधले पर्सनल चॅट्स, फोटो, सेल्फी, वेब ब्राउझिंग हिस्ट्री, डॉक्युमेंट्स आदी सगळ्या बाबी फोनमधून काढून टाकणं आवश्यक असतं. अन्यथा त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा काही लोक जुन्या अँड्रॉइड फोनवरून (Old Smartphone) ऑनलाइन अकाउंट्समधून साइन आउट करायलाही विसरतात. फोन रिसेट करण्यापूर्वी साइन आउट केलं नसेल, तर पुन्हा लॉगिनच्या वेळी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनमुळे अडचण येऊ शकते आणि काही मेसेजेस 'मिस'ही होऊ शकतात.

किती वेळा Password बदलणं योग्य? Google च्या सुंदर पिचईंनीच सांगितलं

फोन रिसेट करण्यापूर्वी सर्वांत आधी Settings मध्ये जाऊन Accounts या पर्यायावर जावं. तिथे गेल्यावर तुम्ही त्या फोनवर लॉगिन केलं असलेली सगळी अकाउंट्स (Accounts) दिसतील. त्यात व्हॉट्सअॅप, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट एक्स्चेंज अकाउंट्स, ट्रूकॉलर, ट्विटर अशा अनेक अकाउंट्सचा समावेश असतो. शिओमी किंवा वनप्लस फोन असेल तर त्या कंपन्यांची अकाउंट्सही तिथे यादीत दिसतील. त्या प्रत्येक अकाउंटमधून साइन आउट करणं गरजेचं असतं.

Success Story: देशातील सर्वात मोठा IPO आणणारी कंपनी Paytm ची यशोगाथा

यानंतर तुमच्या अँड्रॉइड फोनवरचं मुख्य गुगल अकाउंट (Google Account) साइन आउट करावं. त्यानंतर त्या फोनवर ही सगळी अकाउंट्स अनुपलब्ध होतील. नव्याने काहीही सिंक होणार नाही.

हे सगळं झाल्यावर अँड्रॉइड फोन रिसेट (Android Phone Reset) करावा. त्यासाठी सेटिंग्ज अॅप उघडावं. त्यात सर्च बारवर किंवा आयकॉनवर क्लिक करावं. Reset हा शब्द सर्च करावा. त्यानंतर Factory Data Reset हा पर्याय निवडावा. Next वर टॅप करून त्यातून reset हा पर्याय निवडावा. त्यानंतर फोनवर क्लीनिंग प्रोसेस पूर्ण करू द्यावी. त्यानंतर फोन रिस्टार्ट होईल. रिसेट यशस्वी झालं, तर फोन पुन्हा सुरू झाल्यावर अँड्रॉइड वेलकम स्क्रीन दिसेल. तिथून नवा युझर तो फोन वापरू शकेल.

First published:

Tags: Mobile Phone, Smartphone, Technology