• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • स्मार्टफोन वापरून कमवा पैसे! करावं लागेल हे काम

स्मार्टफोन वापरून कमवा पैसे! करावं लागेल हे काम

स्मार्टफोनचा वापर करून घरबसल्या कमवा पैसे

स्मार्टफोनचा वापर करून घरबसल्या कमवा पैसे

उत्पन्नाच्या शोधात असलेल्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. दोन प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) आता तुम्हाला उत्पन्नाचा नवा स्रोत (Source of Income) अगदी घरबसल्या उपलब्ध करून देत आहेत.

  • Share this:
मुंबई, 20 ऑगस्ट : सध्या कोरोनामुळे (Corona) सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे रोजगार आणि नोकऱ्या (Jobs) अडचणीत आल्या आहेत. अर्थचक्रावर परिणाम झाल्याने अनेक कंपन्यांनी पगारकपात केली आहे, यामुळे नोकरदार वर्गाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक जण अतिरिक्त उत्पन्नाची साधनं शोधत आहे. उत्पन्नाच्या शोधात असलेल्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. दोन प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) आता तुम्हाला उत्पन्नाचा नवा स्रोत अगदी घरबसल्या उपलब्ध करून देत आहेत. तुम्हाला तुमच्या मित्राने रिचार्ज (Recharge) करायला सांगितलं, तर तुम्हाला पैसे नसल्याचे बहाणे सांगण्याची गरज नाही. कारण त्याचं रिचार्ज करून तुम्हाला पैसे कमावता येणार आहेत. उत्पन्नाचा हा फायदेशीर मार्ग एअरटेल (Airtel) आणि रिलायन्स जिओ (Reliance Jio) या कंपन्या उपलब्ध करून देत आहेत. तुम्ही एअरटेल किंवा जिओचा नंबर रिचार्ज केला तर कंपनी तुम्हाला चार टक्क्यांपर्यंत कमिशन देणार असून, यासोबत काही क्रेडिट्सही (Credits) यासोबत मिळणार आहेत. एअरटेल आणि जिओ या टेलिकॉम कंपन्या आपल्या लाखो ग्राहकांना अधिक पैसे आणि क्रेडिट मिळवण्यासाठी संधी उपलब्ध करून देत आहेत. जिओने आपल्या युजर्ससाठी एक ऑफर (Offer) आणली आहे. यासाठी जिओने Jio POS Lite नावाचं एक अॅपदेखील लॉन्च केलं आहे. जिओने गुगल प्ले स्टोअरवर शेअर केलेल्या माहितीनुसार, 10 मिनिटांच्या आता कोणीही व्यक्ती या अॅपवर स्वतः रजिस्ट्रेशन करू शकते. यानंतर लगेच तुम्हाला जिओ नंबर्स रिचार्ज करता येऊ शकतात. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही डॉक्युमेंट्सची गरज नाही. युजरला सर्वप्रथम इन-बिल्ट वॉलेटमध्ये पैसे टाकणं गरजेचं आहे त्यानंतरच तो अन्य कोणाही व्यक्तीचे जिओ क्रमांक रिचार्ज करू शकेल. दुसऱ्या कोणाचाही जिओ क्रमांक रिचार्ज केल्यानंतर मिळणारं कमिशन थेट Jio POS Lite अॅपच्या वॉलेटमध्ये जमा होणार आहे. तसंच तुम्ही किती रुपयांचं रिचार्ज करता त्यावर तुमचं कमिशन अवलंबून असणार आहे. आतापर्यंत सुमारे 10 हजार लोकांनी हे अॅप (App) डाउनलोड केलं आहे. जिओप्रमाणे एअरटेलने एअरटेल थँक्स अॅपवर (Airtel Thanks App) एक नवी सुविधा दिली आहे. त्या माध्यमातून युझरने दुसऱ्या व्यक्तीचा एअरटेल क्रमांक रिचार्ज केला, तर संबंधित युजरला चार टक्क्यांपर्यंत थेट कमिशन मिळणार आहे. एअरटेल थँक्स अॅपमध्ये या सुविधेला Airtel Super Hero असं नाव दिलं गेलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं, तर समजा ए हा युजर बी युजरसाठी 100 रुपयांचं रिचार्ज करत असेल, तर रिचार्ज करतेवेळी ए युजरकडचे केवळ 96 रुपये वजा होतील. याचाच अर्थ ए युजरला अशा प्रकारे 4 टक्के थेट फायदा होईल. या रिचार्जच्या पेमेंटसाठी युजर यूपीआय, क्रेडिट-डेबिट कार्डसारख्या ऑनलाइन पेमेंटचाही वापर करू शकतो. तसंच एअरटेल पेमेंट्स बॅंकेचा पर्यायदेखील युजरला उपलब्ध असेल. अशा पद्धतीनं तुम्ही घरबसल्या सहज पैसे कमावू शकता.
First published: