Home /News /technology /

मुंबईतील या ठिकाणी पहिलं पब्लिक Electric Charging Station सुरू, एका यूनिटसाठी द्यावे लागणार इतके पैसे

मुंबईतील या ठिकाणी पहिलं पब्लिक Electric Charging Station सुरू, एका यूनिटसाठी द्यावे लागणार इतके पैसे

फोटो सौजन्य : Aaditya Thackeray Twitter

फोटो सौजन्य : Aaditya Thackeray Twitter

मुंबईत पहिलं पब्लिक इलेक्ट्रिक व्हिकल चार्जिंग स्टेशन (Electric Charging Station) स्थापित करण्यात आलं आहे.

  मुंबई, 20 ऑगस्ट : देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी (Electric Vehicles) प्रोत्साहन दिलं जात आहे. आता मुंबईत पहिलं पब्लिक इलेक्ट्रिक व्हिकल चार्जिंग स्टेशन (Electric Charging Station) स्थापित करण्यात आलं आहे. दादरमध्ये (Dadar) हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दादरमध्ये कोहिनूर बिल्डिंगच्या (Kohinoor Building) पार्किंगमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशनचं (EV Charging Station) उद्धाटन केलं. BMC ने दिलेल्या माहितीनुसार, नवं लाँच करण्यात आलेलं ईव्ही चार्जिंग स्टेशन 24 तास युजर्ससाठी खुलं राहणार आहे. स्टेशनवर सात चार्जर उपलब्ध असून त्यापैकी चार फास्ट चार्जर आहेत, जे एक इलेक्ट्रिक कार जवळपास एक ते दीड तासात पूर्ण चार्ज करू शकतात. इतर तीन रेग्युलर ईव्ही चार्जर आहेत, जे जवळपास सहा तासांत एक इलेक्ट्रिक कार पूर्णपणे चार्ज करण्यासाठी सक्षम आहे. वाहनं चार्ज करण्यासाठी 15 रुपये प्रति यूनिट असे पैसे घेतले जाणार आहेत.

  Scrappage Policy सर्वसामान्यांसाठी फायद्याची,केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले फायदे

  पर्यावरणासाठी अनुकूल असणारी इलेक्ट्रिक वाहनं सध्याची गरज असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच त्यांनी आपल्या अखत्यारितील विविध पार्किंग स्पॉट्सवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी अधिक चार्जिंग सुविधा इन्स्टॉल करण्याचंही सांगितलं आहे.

  OLA e-scooter: या 4 चार राज्यात सबसिडी अंतर्गत स्वस्तात मिळणार स्कूटर, पाहा किती कमी होईल किंमत

  इलेक्ट्रिक वाहनांची संख्या अधिक असणाऱ्या भागात चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी प्राथमिकता देणंही आवश्यक असल्याचं ते म्हणाले. यासंबंधी डिटेल सर्व्हे केला जाईल आणि अधिकाधिक पार्किंग स्पॉट्सवर चार्जिंग स्टेशन उपलब्ध केले जातील, असंही ते म्हणाले.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Karishma
  First published:

  Tags: Aaditya thackeray, Electric vehicles

  पुढील बातम्या