नवी दिल्ली, 11 जुलै: भारत स्मार्टफोन्सची (Smartphone) सर्वाधिक मागणी असलेल्या देशापैकी एक आहे. आता अनेक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या चीन नाही, तर भारतातच फोनची निर्मिती करणार आहेत. Samsung, Oppo, Vivo आणि Lava या कंपन्या स्मार्टफोनची निर्मिती भारतातच करणार आहेत. मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगसाठी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) देशातील प्रमुख केंद्र बनण्याच्या दिशेने प्रयत्नशिल आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली पॉलिसीमुळे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठ्या कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक केली आहे.
Vivo मोबाईल प्रायव्हेट लिमिटेड 7000 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन मोबाईल हँडसेट बनवण्याची फॅक्ट्री उभारणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा कोटी मोबाईल तयार केले जातील. दुसऱ्या टप्प्यात दरवर्षी 12 कोटी मोबाईल फोन बनवले जातील. तसंच या फॅक्ट्रीमुळे 60 हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचीही माहिती आहे.
दुसरीकडे Lava इलेक्ट्रॉनिक्स नोएडामध्ये आपली फॅक्ट्री लावून मोबाईल हँडसेट तयार करत आहे. सॅमसंगनेही (Samsung) मागील वर्षी नोएडामध्ये आपली फॅक्ट्री उभारली आहे.
मोबाईल फोन बनवण्यासाठी राज्यात करण्यात येत असलेल्या या गुंतवणुकीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की राज्य सरकारची आयटी आणि मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी 2017 आणि मोबाईल हँडसेट मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात झालेल्या या बदलामुळे विकासाला हातभार लागला असून मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग (Mobile Manufacturing) सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक झाली आहे. यामुळे नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसंच या क्षेत्रात जशी प्रगती होईल, तशा नोकरीच्या आणखी संधी उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mobile Phone, Oppo smartphone, Samsung, Smartphone, Vivo