मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता गुगलवर गाणी शोधा, फक्त चाल गुणगुणत

आता गुगलवर गाणी शोधा, फक्त चाल गुणगुणत

 बऱ्याचदा एखादं गाणं आपल्याला आठवत नसतं, म्हणून आपण त्या गाण्याची चाल गुणगुणत असतो. बरेच वेळा आपल्याला गाण्याचे शब्द आठवत नसतात.  पण आता गुगल (google) तुमची ही चिंता मिटवणार आहे. लवकरच गुगल यावर तोडगा आणत आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 18 ऑक्टोबर : बऱ्याचदा एखादं गाणं आपल्याला आठवत नसतं, म्हणून आपण त्या गाण्याची चाल गुणगुणत असतो. बरेच वेळा आपल्याला गाण्याचे शब्द आठवत नसतात, पण चाल गुणगुणल्यामुळे आपल्याला गाणं आणि शब्द आठवतील, असं वाटत असतं. एवढं करुनही डोक्याला कितीही चालना दिली तरी काही केल्या आपल्याला ते गाणं आठवत नाही. पण आता गुगल तुमची ही चिंता मिटवणार आहे. लवकरच गुगल यावर तोडगा आणत आहे.

गुगल (Google) मध्ये तुम्ही एखादं गाणं गुणगुणून सर्च करू शकाल. 15 ऑक्टोबरला झालेल्या गुगलच्या 'सर्चऑन' इव्हेंटमध्ये गुगलने आपल्या जी सुट प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या वेगवेगळ्या सेवांमध्ये येणाऱ्या नव्या फीचर्सबद्दल माहिती दिली. गुगल सर्चवर लवकरच 'हमटूसर्च' हे फीचर उपलब्ध होणार आहे. या फीचरच्या मदतीनी आपण सहजच एखादं गाणं गुगल सर्चच्या माइकचं बटण दाबून गुणगुणलं तर लगेच त्या गाण्याची माहिती आपल्याला मिळेल.हे फीचर सुरु व्हायला किती वेळ लागेल? हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही.

याचसोबत गुगल ग्राहकांसाठी आणखी काही सुविधा घेऊन आलं आहे. गुगल मॅप्समध्ये तुम्हाला एखाद्या परिसरात किती गर्दी आहे, हे कळणार आहे. कोविडच्या काळात घरातून बाहेर पडण्याआधी, तुम्ही याचा वापर करून त्या भागातील गर्दीचा अंदाज घेऊ शकाल. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगही पाळता येईल. ‘Usually as busy as it gets’आणि ‘Usually not too busy’असे दोन इंडिकेटरही गुगल मॅपवरील त्या ठिकाणाच्या नावाखाली जोडण्यात येणार आहेत.

एखाद्या ठिकाणची गर्दी मोजण्यासाठी त्याठिकाणी असलेल्या गुगलच्या युझर्सच्या संख्येचा अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी युजर्सनी आपल्या गुगल अकाउंटमधील सेटिंग सुरू ठेवणं गरजेचं असेल. त्यानुसार तिथल्या लोकांचा अंदाज गुगलची यंत्रणा बांधणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणची दर तासाची गर्दी मोजता येणार आहे, असं गुगलनी सांगितलं.

गुगलवर होणाऱ्या सर्चमध्ये बऱ्याच वेळा चुकीची स्पेलिंगअसतात, हे रोखण्यासाठी गुगलने 'डीपन्यूरलनेट' अल्गोरिदम वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे एखाद्यानी गुगल सर्चमध्ये चुकीचं स्पेलिंग टाकलं तरीही त्याला योग्य माहिती मिळेल.

First published: