नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : रिलायन्स जीओच्या (Reliance Jio) सब्सक्राइबर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. Jioच्या सक्रिय ग्राहकांच्या संख्येत जुलैमध्ये 25 लाखांची वाढ झाली आहे. याआधीच्या महिन्यात सक्रिय ग्राहकांच्या संख्येत घट झाली होती. जीओच्या प्रतिस्पर्धी कंपन्या भारतीय एयरटेलच्या (Airtel) सक्रिय ग्राहकांच्या संख्येत जुलैमध्ये 4 लाखांची घट झाली आहे. तसंच वोडाफोन-आयडियाचेही (Vodafone Idea) 38 लाख सक्रिय ग्राहक कमी झाले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (TRAI) ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
आकड्यांनुसार, फेब्रुवारीनंतर पहिल्यांदा जुलैमध्ये टेलिकॉमच्या एकूण ग्राहकांच्या संख्येत 35 लाखांची वाढ झाली आहे. परंतु यादरम्यान सक्रिय ग्राहकांची संख्या एकूण 21 लाखांनी घटली आहे.
वाचा - OLA पुण्यात सुरू करणार नवं टेक्नोलॉजी सेंटर; हजारो लोकांना नोकरीची संधी
सक्रिय ग्राहकांच्या संख्येची गणना व्हिजिटर लोकेशन रजिस्टरद्वारे (वीएलआर) केली जाते. हे मोबाईल नेटवर्कवरील सक्रिय ग्राहकांची संख्या सांगतं. ट्रायनुसार, देशात एकूण वायरलेस कनेक्शची संख्या जुलैमध्ये 114.4 कोटी होती. 2020 मध्ये यापैकी सक्रिय कनेक्शची संख्या 95.58 कोटी होती.
ट्रायने दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2020 मध्ये जीओच्या सक्रिय ग्राहकांची संख्या 31.3 कोटी होती. तर एयरटेलच्या सक्रिय ग्राहकांची संख्या 31 कोटी आणि वोडाफोन-आयडियाच्या सक्रिय ग्राहकांची संख्या 26.9 कोटी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.