मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /दमदार फीचर्ससह लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S22 FE; वाचा डिटेल्स

दमदार फीचर्ससह लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S22 FE; वाचा डिटेल्स

लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S22 FE; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S22 FE; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स निर्माण करणारी सॅमसंग कंपनी फेब्रुवारी 2023 मध्ये त्याची फ्लॅगशिप Galaxy S23 सीरिज लाँच करणार आहे. त्यानंतर ते Galaxy S22 Fan Edition (FE) स्मार्टफोन लाँच करण्याच्या विचारात असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलंय.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 28 डिसेंबर : लवकरच तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचा आवडता ब्रँड सॅमसंग असेल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स निर्माण करणारी सॅमसंग कंपनी फेब्रुवारी 2023 मध्ये त्याची फ्लॅगशिप Galaxy S23 सीरिज लाँच करणार आहे. त्यानंतर ते Galaxy S22 Fan Edition (FE) स्मार्टफोन लाँच करण्याच्या विचारात असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलंय. एका टिपस्टरने माहिती दिली आहे की कंपनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी यूएसमध्ये Galaxy S22 FE चे अनावरण करू शकते.

    हँडसेट रद्द झालेल्या Samsung Galaxy A74 5G ची जागा हा नवीन फोन घेऊ शकतो, असा दावा टिपस्टरने केला आहे. Galaxy A74 फोनच्याच किमतीत हा फोन येण्याची शक्यता आहे. अशातच या फोनमध्ये कोणती फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असू शकतात, ते जाणून घेऊयात.

    सॅमसंग गॅलेक्सी S22 FE ची संभाव्य स्पेसिफिकेशन्स-

    Samsung Galaxy S22 FE ला नवीन Samsung प्रोसेसर आणि कॅमेरा सेन्सरसह लाँच करण्याची शक्यता आहे. यात Exynos 2300 4nm चिपसेट असू शकतो, असं म्हटलं जातंय. पण आतापर्यंत या प्रोसेसरची घोषणा करण्यात आलेली नाही. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास स्मार्टफोनमध्ये Samsung 108MP HM6 सेन्सर असू शकतो. Galaxy S21 FE मध्ये फक्त 12MP प्राइमरी सेन्सर देण्यात आला होता.

    काही दिवसांपूर्वी बाहेर आलेल्या माहितीनुसार, कंपनी Galaxy S23 सीरिज लाँच करण्याआधी Galaxy S22 FE आणि Galaxy Buds 2 ला एकाच वेळी लाँच करण्याची तयारी करत आहे. आणखी एक टिपस्टर डोह्यून किमने याबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे. यावेळी गॅलेक्सी S23 FE ला सीरिजबरोबर लाँच केलं जाणार नसल्याचं त्याने म्हटलंय.

    हेही वाचा: Cyber Insurance: सायबर इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय? फसवणूक झाल्यास कसा क्लेम करायचा?

    Samsung Galaxy F14 लवकरच लाँच होण्याची शक्यता

    सॅमसंग लवकरच भारतात Samsung Galaxy F14 लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन जानेवारी 2023 मध्ये लाँच होईल. हा फोन फ्लिपकार्ट तसंच सॅमसंग ऑनलाइन स्टोअर आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरच्या माध्यमातून देशभरात विकला जाईल. पण हा फोन 5G कनेक्टिव्हिटीसह येईल की नाही याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच फोन भारतात नेमक्या कोणत्या तारखेला लाँच केला जाईल, याबद्दलही कोणतीच माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही.

    First published:

    Tags: Samsung, Samsung galaxy, Smartphone