मराठी बातम्या /बातम्या /मनी /Cyber Insurance: सायबर इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय? फसवणूक झाल्यास कसा क्लेम करायचा?

Cyber Insurance: सायबर इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय? फसवणूक झाल्यास कसा क्लेम करायचा?

सायबर सिक्युरिटी इन्शुरन्स म्हणजे काय?

सायबर सिक्युरिटी इन्शुरन्स म्हणजे काय?

सायबर सिक्युरिटी इन्शुरन्स म्हणजे काय?

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई: सध्याच्या काळात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. सतत ऑनलाइन फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. अशा स्थितीत सुरक्षेसाठी 'सायबर इन्शुरन्स' घेणं गरजेचं आहे.

  सायबर इन्शुरन्स तुम्हाला केवळ सायबर धोक्यांमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण देत नाही तर तुमचा डेटा रिस्टोरेशन, कोणतीही नियामक कारवाई किंवा खटल्याशी संबंधित इतर खर्चदेखील कव्हर करतो. याबाबत आयसीआयसीआय लोम्बार्ड गिगमधील रीइन्शुरन्स आणि क्लेम विभागाचे चीफ अंडररायटिंग अधिकारी संजय दत्ता यांनी अधिक माहिती दिली आहे.

  सायबर सिक्युरिटी इन्शुरन्स म्हणजे काय?

  सायबर इन्शुरन्स किंवा सायबर सुरक्षा विमा ग्राहकांना बँक खात्यातील फसवणूक, अनधिकृत व्यवहार आणि यासारख्या इतर अॅक्टिव्हिटींसाठी संरक्षण प्रदान करतो. आत्तापर्यंत यासाठी दोन प्रकारची प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. ज्यामध्ये, कॉर्पोरेटसाठी कॉर्पोरेट सायबर लाएबलिटी पॉलिसीज आणि वैयक्तिक खरेदीदारांसाठी रिटेल सायबर लाएबलिटी पॉलिसींचा समावेश आहे.

  तसंच, B2B2C हा एक विकसित होणारा विभाग आहे. यामध्ये कॉर्पोरेट कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी पॉलिसी खरेदी करतात किंवा त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर किंवा अॅप्लिकेशनवर खरेदी करण्याची ऑफर देतात.

  Venugopal Dhoot : ICICI बँक कर्ज प्रकरण, कोचर दाम्पत्यापाठोपाठ CBI ची आणखी एक मोठी कारवाई

  1) प्री-पँडेमिक क्लेमनंतर कोणत्या प्रकारचे सायबर हल्ले झाले आहेत आणि साथीच्या रोगाला सुरुवात झाल्यापासून ते प्रमाण किती आहे?

  कोविड साथीच्या आजारापूर्वी क्लेमची संख्या तुलनेनं कमी होती. मुख्यतः बीएफएसआयसारख्या विशिष्ट क्षेत्रांना आणि हाय नेट वर्थ असलेल्या कॉर्पोरेट्सना लक्ष्य केलं जात होतं. पण, कोविडनंतर अनेक उद्योगांमध्ये क्लेमच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ई-मेल कॉम्प्रमाईज आणि रॅन्समवेअर अॅटॅकमुळे कोरोनानंतर सायबर इन्शुरन्स क्लेममध्ये वाढ झाली आहे.

  2) अलीकडच्या काळात सायबर हल्ल्यांमुळे क्लेमच्या संख्येत कशाप्रकारे वाढ झाली आहे?

  गेल्या वर्षीपासून सायबर अलर्टच्या संख्येत अनेकपटींनी वाढ झाली आहे. हे हल्ले प्रामुख्याने रॅन्समवेअर आणि व्यवसाय ई-मेल कॉम्प्रमाईज हल्ल्यांचं संयोजन आहेत. व्यवसायातील व्यत्ययांमुळे, क्लेमच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. कारण, सायबर हल्लेखोर अधिक हुशार होत आहेत. या व्यतिरिक्त, मोठ्या प्रमाणात डेटा एक्सफिल्टेशनचा त्रासदायक ट्रेंडदेखील निदर्शनास आला आहे. त्यामुळे डेटा लाएबलिटी क्लेमची संख्या वाढली आहे.

  3) कंपन्यांना सायबर इन्शुरन्स प्रदान करताना कोणते पॅरामीटर्स बघितले जातात?

  समाविष्ट जोखमीचे पुनरावलोकन करण्याव्यतिरिक्त, कंपनीचं सर्वसमावेशक मूल्यांकन केलं जातं. त्यासाठी तीन प्रमुख घटक लक्षात घेतले जातात. लोक (मानवी फायरवॉल किती मजबूत आहेत), प्रक्रिया (अंतर्गत प्रक्रिया किती परिपक्व आहेत) आणि तंत्रज्ञान (सुरक्षा नियंत्रण किती व्यवस्थित आहेत), या तीन घटकांचा त्यात समावेश होतो.

  मित्रांकडून कॉन्ट्री गोळा करण्याचं काम आता UPI अ‍ॅप्स करणार; कॅल्क्युलेटरची गरज नाही

  माहिती सुरक्षा धोरण, व्यवसाय सातत्य योजना, डेटाचं स्वरूप, उद्योग, त्यांच्या ऑपरेशन्सची जिओ-ग्राफिकल उपस्थिती आणि बाह्य स्कॅनच्या विविध पुनरावलोकनांच्या एकत्रिकरणांद्वारे हे मूल्यांकन केलं जातं.

  4) सायबर सुरक्षिततेबाबत ग्राहकांनी कोणत्या बाबींचं पालन करायला हवं असं तुम्हाला वाटतं?

  या घडामोडींशी संबंधित नियामक व्यवस्थेतील गतिमान बदल लक्षात घेऊन, आम्ही नियमन केलेल्या वातावरणात काम करणाऱ्या ग्राहकांच्या स्थितीवर बारीक नजर ठेवतो. किंबहुना तसंच केलंही पाहिजे. अलीकडच्या काळात विकसित झालेल्या काही अतिरिक्त कल्पना पुढीलप्रमाणे आहेत:

  A. वर्कफोर्सची जागृती करणं आणि त्यांना प्रशिक्षण देणं

  B. आयएसओ 27001 सारखी सुरक्षा प्रमाणपत्र बहाल करणं.

  C. डेटा संकलन आणि संचयन (जीडीपीआर, वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक आणि आय कायदा) संबंधित अंतर्गत धोरणं

  D.बाह्य ऑडिटची वारंवारता आणि कमकुवतपणा दूर करण्यामध्ये प्रगती.

  5) ग्राहकांनी कोणत्या बाबींचं पालन करायला हवं, याबाबत तुम्ही काही कल्पना मांडल्या आहेत का?

  अलीकडील काळातील घडामोडी पाहता, आम्ही जोखमीचं मूल्यांकन करताना विमाधारकाच्या विविध कायदेशीर आवश्यकतांच्या पालनाशी संबंधित घटकांना अधिक महत्त्व देतो.

  First published:
  top videos

   Tags: Cyber crime