मुंबई, 2 जानेवारी : Samsung Galaxy M52 5G च्या किंमतीत या आठवड्यात कपात करण्यात आली आहे. हा फोन सप्टेंबर 2021 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि आता ग्राहक तो कमी किंमतीत घरी आणू शकतात. फोनच्या किंमतीत 2,500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे Samsung Galaxy M52 5G च्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत 27,499 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 29,499 रुपये झाली आहे. हा फोन Qualcomm प्रोसेसर आणि Android 11 वर काम करतो. ग्राहक हा फोन ब्लेझिंग ब्लू आणि आयसी ब्लू कलरमध्ये खरेदी करू शकतात.
किंमतीत कपात केल्यानंतर, हा फोन थेट Xiaomi Mi 11 Lite NE 5G शी स्पर्धा करेल, ज्याची किंमत 26,999 रुपये आहे आणि Realme X7 Pro 5G ची किंमत 29,999 रुपये आहे. या फोनची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याचा ट्रिपल कॅमेरा, 120Hz सुपर AMOLED डिस्प्ले आणि 25W चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स कसे आहेत याबद्दल माहिती घेऊया.
Samsung Galaxy M52 5G मध्ये 6.7-इंचाचा फुल HD+ सुपर AMOLED प्लस डिस्प्ले आहे, जो 20:9 आस्पेक्ट रेशो आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. त्याचे रिझोल्यूशन 1080×2 400 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरवर काम करतो आणि 8GB पर्यंत रॅम आहे. मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. हा फोन ब्लेझिंग ब्लॅक आणि आइसी ब्लू या दोन रंगात येतो.
एकदाच पैसे द्या, वर्षभर झंझट नाही; धमाकेदार मोबाईल रिचार्ज प्लॅन
64 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल
या फोनमध्ये 64 मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय 12-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5-मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. समोर, 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
पॉवरसाठी, Samsung Galaxy M52 5G मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 25W चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G LTE, WiFi 6, Bluetooth, GPS, SFC आणि USB Type-C पोर्ट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Samsung galaxy, Smartphone