मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

15 हजारांचा Samsung Galaxy स्मार्टफोन फक्त 4 हजारात; Amazon वर खास ऑफर

15 हजारांचा Samsung Galaxy स्मार्टफोन फक्त 4 हजारात; Amazon वर खास ऑफर

Amazon वर सेल सुरू असून कंपनीने त्या लिस्टमध्ये आपला स्मार्टफोन ठेवला आहे. ग्राहकांना Samsung Galaxy M32 वर 4 हजार रुपयांपर्यंतची ऑफर मिळत आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 14 जुलै: स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग (Samsung) भारतीय बाजारात आपले नवे स्मार्टफोन लाँच करत आहे. कंपनीने 21 जून 2021 रोजी आपला सॅमसंग गॅलेक्सी M 32 (Samsung Galaxy M32) फोन लाँच केला. कंपनीने लोकांचं बजेट लक्षात घेता स्मार्टफोनची किंमत कमी ठेवली आहे. तसंच Amazon वर या स्मार्टफोन खरेदीवर ग्राहकांना जबरदस्त डिस्काउंट (Amazon Offer) मिळणार आहे. 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज वेरिएंट फोन 14,999 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो.

Amazon वर सेल सुरू असून कंपनीने त्या लिस्टमध्ये आपला स्मार्टफोन ठेवला आहे. ग्राहकांना Samsung Galaxy M32 वर 4 हजार रुपयांपर्यंतची ऑफर मिळत आहे.

Samsung Galaxy M32 स्पेसिफिकेशन्स -

- 6.32 इंची डिस्प्ले

- 6000 mAh बॅटरी

- One UI 3.1

- अँड्रॉईड 11

- मीडियाटेक हेलियो जी 80 प्रोसेसर

क्वाड रिअर कॅमेरा -

Samsung Galaxy M32 फोनला प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल, तर दुसरा 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स, तर 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर असे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

(वाचा - जुना फोन विकण्याआधी किंवा Exchangeकरण्यापूर्वी ही 3 कामं कराच;अन्यथा येईल समस्या)

- ICICI बँकेच्या ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर मोठा फायदा मिळतो आहे. ICICI क्रेडिट आणि डेबिट कार्डवरुन पेमेंट केल्यानंतर 1250 रुपयांची सूट आहे.

-  तसंच एखाद्याकडे Prime Member असेल, तर 10 हजार रुपयांपर्यंतचा फायदा आहे.

- त्याशिवाय फोन एक्सचेंज करुन 11,110 रुपयांपर्यंतची ऑफर आहे. एक्सचेंजमध्ये इतका मोठा फायदा झाल्यास, हा फोन केवळ 3899 रुपयांत खरेदी करता येईल. म्हणजेच या ऑफरमध्ये 14,999 चा फोन एक्सचेंज किंमतीनंतर 4 हजारांपर्यंत खरेदी करता येईल.

तसंच ICICI युजर्स EMI वर स्टँडर्ड प्लॅनमध्ये 1361 रुपये दर महिन्याला देऊन हा फोन खरेदी करू शकतात. 12 महिन्यांपर्यंत ग्राहकांना 1361 रुपये EMI भरावा लागेल.

(वाचा - Mi Anniversary Sale: स्वस्त स्मार्टफोनसह फ्रीमध्ये मिळतोय Wifi Smart Speaker)

HDFC बँकेचे युजर्स EMI वर स्टँडर्ड प्लॅनमध्ये 943 दर महिन्याला देऊन फोन खरेदी करू शकतात. दर महिन्याला EMI वर 943 रुपये 18 महिन्यांपर्यंत भरावे लागतील.

First published:

Tags: Samsung, Samsung galaxy, Samsung galaxy offers