मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /हातातच झाला Samsung Galaxy फोनचा ब्लास्ट, एका ठिणगीने संपूर्ण घर जळून खाक

हातातच झाला Samsung Galaxy फोनचा ब्लास्ट, एका ठिणगीने संपूर्ण घर जळून खाक

नवा फोन खरेदी केल्यानंतर अगदी काही दिवसांतच त्याचा फोन सतत गरम होऊ लागला. पण फोनमुळे अशाप्रकारे भयंकर अपघात होईल याची त्याने जराही कल्पना केली नव्हती.

नवा फोन खरेदी केल्यानंतर अगदी काही दिवसांतच त्याचा फोन सतत गरम होऊ लागला. पण फोनमुळे अशाप्रकारे भयंकर अपघात होईल याची त्याने जराही कल्पना केली नव्हती.

नवा फोन खरेदी केल्यानंतर अगदी काही दिवसांतच त्याचा फोन सतत गरम होऊ लागला. पण फोनमुळे अशाप्रकारे भयंकर अपघात होईल याची त्याने जराही कल्पना केली नव्हती.

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : सध्या मोबाईल फोन (Mobile Phone) सर्वाच्याच आयुष्यात महत्त्वाचा भाग झाला आहे. गेमिंगपासून ऑनलाईन बँकिंग, पेमेंट, शॉपिंग अनेक गोष्टी फोनवरुन एका क्लिकवर केल्या जातात. स्मार्टफोन अतिशय सोयीचा असला, तरी काही कारणांनी फोनमुळे अपघातही झाले आहेत. असाच फोनमुळे झालेला एक भयंकर अपघात समोर आला आहे. एका व्यक्तीने मोबाईल फोन खरेदी केला. परंतु त्या फोनमुळे त्याचं संपूर्ण घर जळून खाक होईल याची त्याने कल्पनाही केली नसेल.

ग्लास्गो येथे राहणाऱ्या एंड्रू ग्रेंजर (Andrew Granger) नावाच्या व्यक्तीने तीन आठवड्यांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी A02 (Samsung Galaxy A02) फोन खरेदी केला होता. एंड्रूने शहरातील एका इंटरनॅशनल फोन सेंटरमधून हा फोन खरेदी केला होता. डेली रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, त्याने त्याच ठिकाणी त्याचा जुना फोनही चेंज केला होता. पण नवा फोन खरेदी केल्यानंतर अगदी काही दिवसांतच त्याचा फोन सतत गरम होऊ लागला. पण फोनमुळे अशाप्रकारे भयंकर अपघात होईल याची त्याने जराही कल्पना केली नव्हती.

35 वर्षीय एंड्रू घरातच असताना हा अपघात झाला. त्याने फोन हातात पकडला असताना त्याला हाताला भाजल्यासारखं जाणवलं. काही वेळाने हात जळत असल्याचं त्याला वाटलं. तिथेच फोनमध्ये आग लागण्यास सुरुवात झाली होती. हाताला अतिशय भाजल्यासारखं झाल्याने त्याने फोन जमिनीवर फेकला. फोन जमिनीवर टाकल्या टाकल्या जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे फोनमधून ठिणगी उडाली आणि त्या एवढ्याच्या ठिणगीने संपूर्ण घरात पेट घेतला.

Smartphone वापरताना तुम्ही या चुका करत असाल तर सावधान! फोन खराब होण्याचा धोका

मोबाईलमधून ठिणगी उडाल्याने, स्फोट झाल्यावे एंड्रूने फोन पुन्हा उचलून खिडकीबाहेर फेकण्याचा प्लॅन केला. पण फोन खिडकीबाहेर फेकताना तो खिडकीच्या पडद्यांना लागला आणि पडद्यांनी पेट घेतला. हळू-हळू ही आग संपूर्ण घरात पसरली आणि बघता बघता घर संपूर्ण जळून खाक झालं. सिक्योरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या एंड्रूने शेजाऱ्यांच्या फोनवरुन फायर सर्विसला कॉल केला. त्यानंतर टीमकडून आग विझवण्यात आली. एवढ्याशा मोबाईलमुळे भयंकर आग पसरली आणि होत्याच नव्हतं.

First published:
top videos

    Tags: Mobile Phone, Samsung galaxy, Smartphone